अफजल खानचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढला; गोपीचंद पडळकर म्हणाले, जयंत पाटील झोपले आहे का, जागे आहेत का बघत होतो
अफजल खानचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला होता. त्यानंतर जयंत पाटील झोपले आहे का, जागे आहेत का बघत होतो, असं प्रत्युत्तर पडळकर यांनी दिले.

सांगलीत गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून चांगलीच जुंपली आहे. सांगलीच्या सभेत गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील सभेत चुकीचा संदर्भ दिला होता. त्यांनी अफजल खानचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढल्याचा दावा केला होता. परंतु जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांची चूक दुरुस्त केली. त्यानंतर आता त्यावर गोपीचंद पडळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील झोपले आहे का, जागे आहेत का बघत होतो, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
गोपीचंद पडळकरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आला. यावरून जयंत पाटलांनी पडळकरांचा समाचार घेतला होता. यावर पडळकर यांनी प्रतिउत्तर देत म्हणाले जयंत पाटील “झोपले आहे का जागे आहेत हे मी पाहत होतो” जयंत पाटील यांना राजारामबापू पाटील यांचा इतिहास शिवाय दुसरा इतिहास माहीत नाही. कोणीही आम्हाला इतिहास शिकवण्याची गरज नाही. असे ही पडळकर म्हणाले. ते सांगलीत बोलत होते. शिवाजी महाराजांनी वेढा टाकल्यावर कसे बाहेर पडायचे, हे शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. मला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेढा घातला होता. त्यातून मी बाहेर आलोच ना… हा जयंत पाटील फॉरेन रिटर्न आहे. तुला अक्कल असती तर स्टेटमेंट केले नसते. सत्ता आल्यावर बघतो म्हणतात, जयंत पाटील, पण आम्ही तुम्हाला फाट्यावर बांधतोय. तुझी उद्या सत्ता आली तर आमचे काही वाकडे करणार नाही. गोपीचंद पडळकर डरपोक माणूस नाही. पोलिसांना शिवा देत बसलेत. आम्ही सत्तेचा माज करत नाही. आम्ही काल जसे होतो आज तसेच असणार आहे’.