Obc reservation : राज्याला डेटा गोळा करता येत नाही म्हणून केंद्रावर खापर फोडू नका-सदावर्ते

राज्य सरकारला डाटा गोळा करता येत नसेल म्हणून त्याचे खापर केंद्र सरकारवर फोडू नका, राज्य सरकार आणि शरद पवार यांच्या इशाऱ्यावर छगन भुजबळ काम करून ओबीसींना शिक्षण आणि हक्का पासून वंचित ठेवलंय असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेड येथे केलाय.

Obc reservation : राज्याला डेटा गोळा करता येत नाही म्हणून केंद्रावर खापर फोडू नका-सदावर्ते
ॲड. गुणरत्न सदावर्ते
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 5:15 PM

नांदेड : ओबीसी आरक्षावरून राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर सर्वत्र टीका होत असतानाच, गुणरत्न सदावर्ते यांनीही यावेळी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला डाटा गोळा करता येत नसेल म्हणून त्याचे खापर केंद्र सरकारवर फोडू नका, राज्य सरकार आणि शरद पवार यांच्या इशाऱ्यावर छगन भुजबळ काम करून ओबीसींना शिक्षण आणि हक्का पासून वंचित ठेवलंय असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेड येथे केलाय.

पवार आणि भुजबळांनी आरक्षणापासून वंचित ठवले 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे ओबीसींना आरक्षण मिळालं होतं, पण त्या तत्वापासून शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी ओबीसींना वंचित ठेवलंय. आज सर्वोच न्यायालयाने दिलेला निकाल योग्य असून राज्य सरकार आणि यंत्रणा कुचकामी आहे आणि हे आरक्षण जाण्यासाठी हेतुपूर्वक प्रयत्न चालवले आणि छगन भुजबळ यांना दिल्लीला पाठवण्याचे ढोंग केल्याचा आरोप गुणारत्न सदावर्ते यांनी केलाय. तसेच संविधानिक आरक्षण sc आणि st ला आहे .केंद्रा सरकारकडे st चा एक्सजेट डेटा आहे, फेडरल स्ट्रक्चर, स्थानिक स्वराज्य संस्था या केंद्राकडे नसून राज्यसरकार कडे आहेत. तर मग राज्यसरकारला कोणती कमी पडलीय, स्वतःचा डेटा अनु शकत नाही? असा सवाल सदावर्ते यांनी राज्य सरकारला केलाय.

राष्ट्रवादीच्या त्रीशंकुला आरक्षण टिकू द्यायचे नाही

तर शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांना हे आरक्षण टिकूच द्यायच नाहीये. आता कोणतीही निवडणूक थांबणार नाही, हे फक्त धूळ फेकत आहेत. म्हणून निवडणूक होणारच आणि निवडणुकीपासून obc ला वंचित ठेवण्याचे काम हे त्रीशंकूलोक, म्हणजे शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी केलय, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

फळ काढणीनंतर असे करा व्यवस्थापन, अन्यथा होईल नुकसान

OBC Reservation : निवडणुकीच्या तारखा घोषित, आता सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडे, घटनातज्ज्ञांचं मत

नवीन वर्षात Toyota च्या गाड्या महागणार, Fortuner आणि Innova Crysta चा समावेश