मनोज जरांगे विरोधात गुणरत्न सदावर्ते मैदानात; थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली सर्वात मोठी मागणी

मनोज जरांगे विरोधात गुणरत्न सदावर्ते मैदानात उभे ठाकले आहेत. आता सदावर्ते यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच सर्वात मोठी मागणी केली आहे.

मनोज जरांगे विरोधात गुणरत्न सदावर्ते मैदानात; थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली सर्वात मोठी मागणी
| Updated on: Aug 07, 2026 | 2:09 PM

मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. महाराष्ट्रातील नोंदी कट करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. या आरोपानंतर जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा नियोजित दौरा सुरू केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील काही भाग पिंजून काढणार आहे. मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरले आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आता मुख्यमंत्र्‍यांकडे सर्वात मोठी मागणी केली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना सदावर्ते यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले. ‘मनोज जरांगे उदय सामंतांना फोन करतो आणि बावनकुळ्या म्हणतो. एकनाथ शिंदेंना हे अपमानकारक बोलणं चालतं का? एकनाथ शिंदेंना ठाणेका रिक्षा म्हणाल्यावर आग लागते. जरांगे हे बावनकुळ्या म्हणतात ते चालतं का? शिंदे सांगतील ते उदय सामंत बोलतील. मंत्री संजय शिरसाट हे दीपकेंशी बोलायला गेले. त्यानंतर त्यांना थेट काढायची भाषा? बाळ ठाकरेंच्या शिवसेनेत होता, तुम्हाला कोणी मोठं केलं? असा सवाल वकील सदावर्ते यांनी केला.

‘तुम्ही बावनकुळ्या म्हणणाऱ्याला ब्र का म्हणाला नाहीत. जरांगे म्हणतात, तुम्ही केवळ मराठ्यांमुळे मुख्यमंत्री झालात. तुम्ही गरीब आणि बाकी जनतेमुळे सीएम, शिंदेंनी याचाही खुलासा करावा. शिंदे तुम्ही तमाम तेली समाज, सार्वजिनक घटकांचा अपमान केलात, असा आरोप सदावर्ते यांनी केला. मराठवाड्यात चार लोकप्रतिनिधींचे जात कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यावर सदावर्ते म्हणाले, ‘आरक्षणाच्या राजकारणात गलती करेगा तो हिसाब होगा. उद्या संजय शिरसाटला, शिरसाट्या म्हटलं तर चालणार आहे का? ही भाषा चालणार नाही. नुसतं जात प्रमाणपत्र रद्द होणार नाही, तर गुन्हे दाखल होतील, दत्ता रेंगे पाटील मराठा समाजाचे तक्रार देतील. मी म्हणत नाही. तुम्ही अपघाताने मुख्यमंत्री झाले होते. मनाने चांगले असाल, पण तुमच्या डोक्यात आरक्षणाची हवा आहे. संविधानात बोट घालायचा प्रयत्न केलात. तर वायू वेगाने खाली याल, असा इशारा सदावर्ते यांनी दिला. मनोज जरांगेंचा काळ गेला. आता मनोज जरागेंच्या बाबतीत निषेधाचा ठराव कॅबिनेटमध्ये आला पाहिजे, अशी मागणी सदावर्ते यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us