गडचिरोलीत 150 गावांचा संपर्क तुटला, विजेच्या धक्क्याने 25 जनावरांचा मृत्यू

गडचिरोतील भामरागड तालुक्यामधील 60 टक्के गावाला पुराने वेढा दिला आहे. त्यामुळे गडचिरोलीतील 150 गावांचा संपर्क तुटला आहे.

गडचिरोलीत 150 गावांचा संपर्क तुटला, विजेच्या धक्क्याने 25 जनावरांचा मृत्यू

गडचिरोली : गडचिरोलीत गेल्या तीन दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे (Gadchiroli flood) अहेरी तालुक्यातील देवलमर गावाला पुराने वेढलं आहे. यामुळे 25 जनावरांचा विजेच्या धक्क्याने (Gadchiroli Rain) मृत्यू झाला आहे. तर गडचिरोतील भामरागड तालुक्यामधील 60 टक्के गावाला पुराने (Gadchiroli flood) वेढलं आहे. त्यामुळे गडचिरोलीतील 150 गावांचा संपर्क तुटला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून देवालमरी-अहेरी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागातील अनेक गावात नाल्याचे पाणी शिरले आहे. त्यामुळे गडचिरोलीत अनेक गावात पूरपरिस्थिती (Gadchiroli flood) पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जनावरे पुरात वाहून गेली. त्यातील 25 जनावरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेची गावकऱ्यांना माहिती मिळताच विद्युत सेवा खंडीत करण्यात आली.

दरम्यान सध्या जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आष्टी पुलावरील पाणी ओसरू लागल्याने गडचिरोली नागपुर मार्ग सुरु झाला. तसेच दिना नदीला आलेला पूरही ओसरु लागल्याने आलापल्ली गडचिरोली मार्ग सुरु झाला आहे. मात्र अद्याप काही ठिकाणी पाऊस असल्याने आष्टी चंद्रपूर मार्ग अद्याप बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर दुसरीकडे भामरागड तालुक्यातील पुराची परिस्थिती कायम पाहायला मिळत आहे.

सद्यस्थिती भामरागड तालुक्यातील 60 टक्के गाव पुराच्या वेढ्याने अडकली आहेत. तर 600 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून प्रशासनाने जेवणाची व्यवस्था करीत आहे. तसेच पर्लाकोटा पामुलागौतम बंढीया नदीला पूर आला आहे. त्यामुळे गडचिरोलीतील 150 गावांचा संपर्क तुटला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *