
कोरोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच 'महाराष्ट्र दिन' राज्यभरात मोठ्या उत्साहात संपन्न होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात या मोठ्या उत्साहात कामगार दिन साजरा केला जात आहे.

यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

मुंबई येथे भाजप नेते देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत भाजपा आमदार, खासदार व कार्यकर्त्यांनी श्रद्धा सुमन अर्पित केले. भाजपच्या ट्विटर हॅण्डलवर #MaharashtraDayWithBJP असा हॅशटॅगही वापरण्यात आला होता.

भाजपनेही महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत संयुक्त महाराष्ट्राच्या निमिर्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम शूरवीरांना पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली .