हिंदुत्व सहिष्णू, त्यामुळेच ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला झाला नाही: देवेंद्र फडणवीस

हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आण समाधानाने नांदत आहेत. | Devendra Fadnavis

हिंदुत्व सहिष्णू, त्यामुळेच ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला झाला नाही: देवेंद्र फडणवीस

नागपूर: हिंदुत्व सहिष्णू आहेत म्हणूनच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. यामधूनच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (Devendra Fadnavis slams Asaduddin Owaisi in Nagpur)

देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आण समाधानाने नांदत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच हिंदू बहुसंख्य असणाऱ्या देशात असदुद्दीन ओवेसी काहीही बोलू शकतात. तरीही ओवेसींवर हल्ला होत नाही. यामध्येच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते. हैदराबादच्या निवडणुकीसाठी ओवेसी सध्या काहीबाही बोलत आहेत. मात्र, त्यांना याचा फायदा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून यश मिळवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पदवाधीर मतदारसंघाच्या मिशनवर आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात सहा ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस याठिकाणी संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत.

वीजबिल माफी आणि थकबाकी हे दोन वेगळे मुद्दे: चंद्रशेखर बावनकुळे

याच सभेत माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारल लक्ष्य केले. थकबाकीमुळे वीज महामंडळ संकटात असल्याचे बोलले जात आहे. पण राज्य सरकार हा मुद्दा करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे. वीजबिल माफी आणि थकबाकी हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. वीज महामंडळाच्या तीन कंपन्या आहेत. त्या बरखास्त होऊ शकत नाहीत. राज्य सरकारने वीज बिल माफ करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करु, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

‘लव्ह जिहाद’ हा भाजपचा अजेंडा, मुलगा-मुलीची पसंती महत्त्वाची: किशोरी पेडणेकर

उत्तर प्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याच्या तयारीत, देश तोडण्याचा डाव, काँग्रेसचा निशाणा

‘लव्ह-जिहाद’ रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक कायदा; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

(Devendra Fadnavis slams Asaduddin Owaisi in Nagpur)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *