उत्तर प्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याच्या तयारीत, देश तोडण्याचा डाव, काँग्रेसचा निशाणा

भाजपने लव्ह जिहाद हा शब्द देशाला तोडण्यासाठी तसंच एकता आणि एकात्मता धोक्यात आणण्यासाठी बनवला असल्याची खरमरीत टीका गेहलोत यांनी केली.

उत्तर प्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याच्या तयारीत, देश तोडण्याचा डाव, काँग्रेसचा निशाणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) आणि कायदेमंत्री ब्रजेश पाठक (Brajesh Pathak) लवकरच लव्ह (love Jihad) जिहादविरोधात कायदा करण्याच्या विचारात आहेत. त्या दिशेने योगी सरकार पावले टाकत आहे. तसंच मध्य प्रदेशचे शिवराज सरकार देखील यूपी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. भाजपाशासित राज्यांच्या निर्णयावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय. भाजपने (bjp) लव्ह जिहाद हा शब्द देशाला तोडण्यासाठी तसंच एकता आणि एकात्मता धोक्यात आणण्यासाठी बनवला असल्याची खरमरीत टीका गेहलोत यांनी केली. (Congress Cm Ashok gehlot Attacked on UP Govt law Against love jihad)

“विवाह हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे. या विषयावर निर्बंध आणणारा कायदा असंविधानिक असेल. प्रेमात जिहादची कुठलीही जागा असू शकत नाही”, असं गेहलोत म्हणाले. “भाजप देशात अशा प्रकारचं वातावरण तयार करतंय की लोकांना लग्नासाठी सरकारच्या सहानभूतीची आवश्यकता लागेल. भाजपचं हे काम व्यक्ती-स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम आहे”, अशी खरपूस टीका गेहलोत यांनी केली.

“लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याचा आम्हाला प्रस्ताव मिळाला आहे. लॉ कमिशन आणि याअगोदर इतर राज्यांमध्ये असलेल्या लव्ह जिहादच्या संबंधित कायद्यांचा अभ्यास करुनच पुढील पाऊल टाकलं जाईल. यूपीमध्ये लव्ह-जिहादविरोधात तयार होणारा नवीन कायदा धर्मांतरासंदर्भात बनवलेल्या पूर्वीच्या कायद्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल”, असं उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशमधील कथित लव्ह जिहादच्या वाढत्या केसेसविरोधात लव्ह जिहादच्या कायद्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेश सरकारचा कायदा विभाग यावर काम करत आहे. (Congress Cm Ashok gehlot Attacked on UP Govt law Against love jihad)

लव्ह जिहाद रोखण्यासाठी लवकरच प्रभावी कायदा आणणार- योगी

“लव्ह जिहाद रोखण्यासाठी लवकरच प्रभावी आणि कठोर कायदा आणू. खोट्या नावाने आणि वेश बदलून मुलींची होणारी फसवणूक आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही”, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यास ‘लव जिहाद’वर कायदा करणार : भाजप खा. लॉकेट चटर्जी

भाजप खासदार आणि पश्चिम बंगालच्या भाजप महासचिव लॉकेट चटर्जी (Locket Chatterjee) यांनी 2021 मध्ये भाजप सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये लव जिहाद (Love Jihad) विरोधात कायदा तयार करु, असा दावा केलाय.

(Congress Cm Ashok gehlot Attacked on UP Govt law Against love jihad)

संबंधित बातम्या

‘लव्ह-जिहाद’ रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक कायदा; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

 ‘तनिष्क’वर कंगना भडकली, जाहिरातीतून लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

Published On - 8:32 am, Sat, 21 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI