Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचा माजी आमदार, जिल्हाप्रमुख फुटला, ठाकरे गटाला मोठं भगदाड, पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदेंचा शब्द, तुम्हाला काहीही..

Eknath Shinde : सध्या राज्यात कुठल्याही निवडणुका नाहीयत, तरीही उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेत आज शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. हा ठाकरे गटाला धक्का आहे.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचा माजी आमदार, जिल्हाप्रमुख फुटला, ठाकरे गटाला मोठं भगदाड, पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदेंचा शब्द, तुम्हाला काहीही..
Eknath Shinde Shivsena
| Updated on: Nov 04, 2026 | 9:46 AM

हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सध्या कुठल्याही निवडणुका नाहीयत तरी हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्यासह माजी आमदार संतोष टारफे यांचा एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, माजी आमदार संतोष टारफे,यांच्या सह तालुका प्रमुख, माजी जिल्हापरिषद सदस्य ,माजी पंचायत समिती सदस्य, मार्केट कमेटी सदस्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. ठाकरे शिवसेनेला हिंगोली जिल्ह्यात मोठे भगदाड पडलं आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर व आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

मागच्या दोन वर्षात उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे शिवसेनेचा हात धरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता हिंगोलीतही तेच घडलं आहे. “आता शिवसेना पक्षात बाळासाहेबांच्या विचाराच्या पक्षात, आनंद दिघे साहेबांच्या विचाराच्या पक्षात संतोषजी तुम्ही आलेला आहात. तुमचं मी मनापासून स्वागत करतो. विकासाची घौडदौड आपल्याला करायची आहे. त्या भागामधले प्रकल्प असतील, विकास प्रकल्प असतील अर्धवट राहिलेली काम असतील, मला वाटतं बांगरकडे आपण भरपूर निधी दिलेला आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Loading...

तुम्हाला कुठे काही कमी पडणार नाही

“त्या भागाच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे, आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी शिवसेना कायम आपल्या पाठिशी उभी राहिलं याची आपल्याला खात्री देतो. आज आपण खऱ्या शिवसेनेत बाळासाहेबांच्या शिवसेनते प्रवेश केल्याबद्दल मनपासून आपल्याला धन्यवाद देतो. तुम्ही समजाचं, शिवसेनेचं काम करत राहा, तुम्हाला कुठे काही कमी पडणार नाही याची खात्री देतो” असं एकनाथ शिंदे या पक्ष प्रवेशाच्यावेळी म्हणाले. कॅबिनेटची मीटिंग असल्याने जायचं आहे. एकदा मोठा मेळावा लावा येतो तिथे, तु्म्हाला सर्वांना शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल पुन्हा एकदा शुभेच्छा देतो” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us