हिंगोलीत पुन्हा अपघात, 17 ते 18 प्रवाशांची बस उलटली, काय घडलं?

बसमध्ये जवळपास 17 ते 18 प्रवासी होते. बसमधील अनेक प्रवाशांना यामुळे दुखापत झाली.

हिंगोलीत पुन्हा अपघात, 17 ते 18 प्रवाशांची बस उलटली, काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 11, 2023 | 9:52 AM

रमेश चेंडगे, हिंगोलीः हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातली कालच्या बस अपघाताने (Accident) नागरिक सावरले नाहीत, तोच दुसरी एक मोठी घटना घडली आहे. नांदेड-हिंगोली (Nanded Hingoli) मार्गावर आज पहाटेच भीषण अपघात झाला. या मार्गावर एक बस पलटी झाली. बसमध्ये जवळपास 17 ते 18 प्रवासी होते. बसमधील अनेक प्रवाशांना यामुळे दुखापत झाली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नांदेड-हिंगोली मार्गावर आज बुधवारी सकाळीच ही अपघाताची घटना घडली. कळमनुरी तालुक्यातील मसोड शिवारात बसचा पाटा तुटला. त्यामुळे ही बस पलटी झाली.

सालवाडीवरून कळमनुरीच्या दिशेने ही बस येत होते. बसमध्ये १७ ते १८ प्रवासी होते. यात शालेय विद्यार्थी, महिला, पुरुष, लहान मुलांचाही समावेश होता.

मसोड शिवारात अचानक बसचा पाटा तुटला, त्यामुळे चालकाचे बसच्या स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. हा अपघात झाला.

काल कुठे अपघात?

हिंगोली- परभणी जिल्ह्यांदरम्यान काल अपघात घडला. हिंगोली मार्गावर चंद्रपूर- अंबेजोगाई बस झाली पलटी. वसमत तालुक्यातील आडगांव रंजे शिवारात चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली.

चंद्रपूर वरून अंबेजोगाईला ही बस जात होती. बस बस मध्ये 25 ते 30 प्रवासी होते. त्यापैकी चार ते पाच जणांना दुखापत झाली होती.