AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधन संकट एका झटक्यात संपलं, पुन्हा सुरळीत होणार गॅसचा पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज

सध्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून, याचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत आहे. मात्र आता भारतासाठी मोठी गुडन्यूज समोर आली आहे.

इंधन संकट एका झटक्यात संपलं, पुन्हा सुरळीत होणार गॅसचा पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज
LPG gas supplyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 7:33 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा मोठा परिणाम हा इंधन पुरवठ्यावर झाला आहे. जगातील अनेक देशांना या युद्धामुळे इंधन टंचाईची झळ बसली आहे. भारताला देखील मोठा फटका बसला आहे. मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इराणने काही देशांसाठी विशेष: अमेरिका आणि अमेरिकेचे सहकारी देश आणि युरोपीयन देशांसाठी होर्मुजची सामुद्रधुनी बंद केली आहे. तर इतर देशांमधील तेल कंपन्यांनी हल्ला होण्याची भीती असल्यामुळे या मार्गाने तेल वाहतूक करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई जाणवत आहे. दरम्यान भारतामध्ये देखील गॅसचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी गॅस नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. मात्र आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारताचं इंधन संकट दूर होणार आहे. याबाबत सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नॅचलर गॅसचे दोन मोठे कार्गो लवकरच भारतामध्ये येत आहेत. पेट्रोलियम आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. नॅचरल गॅसचे दोन मोठे कार्गो लवकरच भारतामध्ये पोहोचत आहे, कच्च्या तेलाचा पुरवठा देखील सुरळीत आहे, असं यावेळी सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. पुढे बोतलाना त्या म्हणाल्या की, ओएमसीकडून वेगवेगळ्या देशांमधून कच्चे तेल खरेदी केलं जात आहे. पूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारतामध्ये 45 टक्के कच्च तेल यायचं तर इतर मार्गाने 55 टक्के कच्चे तेल यायचं. दरम्यान आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतात येणारं सुमारे 75 टक्के कच्चं तेल हे इतर मार्गाने येत आहे. तर होर्मुझ मार्गे केवळ 25 टक्केच कच्चे तेल भारातमध्ये येत आहे.

दरम्यान ग्राहकांनी गॅस सिलिंडच्या बुकिंगसाठी घाई करू नये, त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे. गॅसचा तुटवडा होणार नाही याकडे सरकारचं लक्ष आहे. तसेच गॅस वितरणावर देखील विशेष लक्ष ठेवलं जात आहे. या जागतिक संकटाच्या काळात इंधन टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असंही यावेळी शर्मा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं