AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश; कोणत्या पक्षाला फटका?

Shivsena : निवडणुका संपल्यानंतरही पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश झाल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश; कोणत्या पक्षाला फटका?
Shivsena incoming Image Credit source: X
| Updated on: Feb 24, 2026 | 10:24 PM
Share

काही दिवसांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. आधी नगर पंचायत, नगर परिषद, त्यानंतर महानगर पालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या सर्व निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचे समोर आले होते. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याचे समोर आले होते. मात्र आता निवडणुका संपल्यानंतरही पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश

शिवसेनेत आज मोठा पक्षप्रवेश पहायला मिळाला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आणि मनसे पक्षाचे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना शुभेच्या दिल्या.

या मान्यवरांनी हाती घेतला भगवा झेंडा

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये बिलोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक लक्ष्मण शेटटीवार, माजी उपाध्यक्ष आनंद गुडमलवार, माजी नगराध्यक्ष देवंण्णा तोंदरोड, चक्रधर पाटील, साईनाथ हंगरगे, नामदेव पाटील देगावकर, वकील अंकुशराजे जाधव, जेजेराव शिंदे, शहाजी बाबरे, सुरेश येलबुगडे, डॉ.सुनील जाधव, सतीश धाने, विठ्ठल कोकणे यांचा समावेश होता.

पक्षाची ताकद वाढली

तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील सडे गावचे सरपंच आणि माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य धीरज पानसंबळ यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी बालाजी पाटील खतगावकर, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यामुळे शिवसेनेला बळकटी मिळाली आहे. तसेच स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढली आहे. याचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अलिकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने चांगली कामगिरी केली आहे. खासकरून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीने विजय मिळवून सत्ता स्थापन केली आहे. तसेच इतर ठिकाणीही शिवसेनेचे सत्ता खेचून आणली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...