AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! …तर मी राष्ट्रवादी सोडणार; रोहित पवारांचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, त्यावर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपली भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली, आता या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

मोठी बातमी! ...तर मी राष्ट्रवादी सोडणार; रोहित पवारांचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
ROHIT PAWARImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 21, 2026 | 3:09 PM
Share

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाऊ शकतो अशी चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झाली होती. अखेर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे की नाही? यावर पक्षाच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

पक्षाचं विलिनीकरण होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला शरद पवार यांची देखील उपस्थिती होती, मात्र यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नाही, परंतु शरद पवार यांच्यासमोरच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये बोलताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

विलिनीकरणाची चर्चा आता थंड झाली आहे, परंतु तरी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीये, तुम्ही एकटे सोडले तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील इतर कोणताही नेता सरकारवर फार काही टीका करताना दिसत नाहीये, त्यामुळे लोकांना अजूनही असं वाटतं की मागच्या दाराने चर्चा सुरू आहे, समजा विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत गेला तर तुमची भूमिका काय असणार? असा प्रश्न यावेळी रोहित पवार यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नला उत्तर देताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीएसोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेल, इतर पर्याय निवडेल पण भाजपसोबत जाणार नाही, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.  रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, मात्र या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं. मी बघेल दुसरा पर्याय निवडेल परंतु मी भाजपसोबत जाणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ