चांगल्या आरोग्यासाठी तुकाराम मुंडे फॉलो करतात फक्त हे 3 नियम, 51 व्या वर्षीही..

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यामध्येच तुकाराम मुंडे यांच्या कारवाईने भेसळयुक्तांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंडे यांनी मोठा खुलासा केला.

चांगल्या आरोग्यासाठी तुकाराम मुंडे फॉलो करतात फक्त हे 3 नियम, 51 व्या वर्षीही..
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 12, 2026 | 10:55 AM

महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरात लोकप्रिय आयएएस अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची ओळख निर्माण झाली. लोक त्यांच्या शिस्त आणि कामाचे मोठे चाहते आहेत. ज्या विभागाचा कारभार तुकाराम मुंडे यांच्याकडे येतो, तो विभाग तूफान चर्चेत असतो. अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी कारभार हातात घेतल्यापासून राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून धमाकेदार कामगिरी केली जात आहे. यामुळे भेसळयुक्तांचे धाबे दणाणली आहेत. मोठं मोठ्या हॉटेलवरही छापे प्रशासनाकडून टाकली जात आहेत. मंत्रालयातील कॅटिंगनही बंद करण्यात आले. अनेक रेस्टारंटचे परवाने रद्द करण्यात आली. तुकाराम मुंडे बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना गावचे आहेत. गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुंडे यांची मागील दहा वर्षांत एकूण 23 वेळा बदली झाली आहे. त्यांची काम करण्याची शिस्त आणि पद्धत कोणाच्याही पचनी पडत नाही.

राज्यभरात हॉटेल, रेस्टारंटवर छापे अन्न व औषध प्रशासनाकडून टाकली जात आहेत. त्यामध्येच तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले की, ते चुकूनही कधी बाहेर खात नाहीत. यासोबतच त्यांनी म्हटले की, आता अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हातात घेतल्यापासून तर बाहेर खाण्याची इच्छाच राहिली नाही. मुळात म्हणजे मला घरगुती साधे जेवण आवडते.

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या फिटनेसचे राज सांगितले. 51 वर्षाचे असतानाही इतका फिटनेस कसा हे त्यांनी सांगितले. तुकाराम मुंडे यांनी म्हटले की, जर आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ताटात काय आहे हे महत्वाचे आहे. जेवणाची वेळ याकडेही लक्ष दिले पाहिजे. रोजच्या खाण्यात तेलकट पदार्थ टाळली पाहिजेत.

मीठ आणि साखरेचे प्रमाण कायमच कमी असावे. पॅकेज्ड फूड शक्यतो टाळले पाहिजे. मुळात म्हणजे फिट राहण्यासाठी काय टाळावे हे महत्वाचे आहे. मीठ जास्त असलेले पदार्थ, मीठ आणि साखर आणि डीप फ्राय पदार्थ दररोज खाणे टाळावे. कधीतरी खाल्ले तर हरकत नाही, पूर्णपणे करावे असा त्याचा अर्थ अजिबात नाही. आईच्या हातची मराठवाड्यातील मसाला वडी, पिठाचं वांग हे पदार्थ माझ्या आवडीची आहेत.

पण हे तिखट पदार्थ रोजच्या जेवणाऐवजी कधीतरी ठीक आहेत. आहारात कायम 90-20 किंवा 80-20 समतोल ठेवला आला पाहिजे. मी हे नियमितपणे पाळतो. कधी कधी आवडीचे पदार्थ खाल्ले पाहिजे. मुळात म्हणजे वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी जेवण कमी करण्याची आवश्यकता नाही.

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी उपाशीही राहतात. मात्र, शरीराला आवश्यक पोषण न देता फिटनेस साध्य करणे योग्य नाही. मुळात म्हणजे फिटनेस म्हणजे कमी खाणे अजिबात नव्हे. संतुलिय आहार अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक आणि ऊर्जा टिकून राहण्यासाठी चांगला आहार घेतला पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us