AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'फडणवीस यांना दाखविण्यासाठी लाळघोटेपणा करू नका, हिंमत असेल तर संसदेत अहिल्यादेवींचा पुतळा उभारा'

‘फडणवीस यांना दाखविण्यासाठी लाळघोटेपणा करू नका, हिंमत असेल तर संसदेत अहिल्यादेवींचा पुतळा उभारा’

| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 1:01 PM
Share

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दाखविण्यासाठी लाळघोटेपणा करू नका. हिंमत असेल संसदेच्या आवारात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवून दाखवा, असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) (RPI Kharat) अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केले आहे.

गोपीचंद पडळकरजी, आपली राजकीय उंची आपणास फार मोठी झाली असे वाटत आहे. म्हणून अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अगोदर करण्याचे ठरवले आहे. येऊ नको परंतू कोणत्या गाडीत बसू, अशी फुकटेगिरी का दाखवता. फक्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दाखविण्यासाठी लाळघोटेपणा करू नका. हिंमत असेल संसदेच्या आवारात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवून दाखवा, असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) (RPI Kharat) अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनावरून राजकारण तापले आहे. शरद पवार या स्मारकाचे उद्घाटन करणार मात्र त्यास गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे. शरद पवार या व्यक्तीला विरोध नसून प्रवृत्तीला असल्याचेही ते म्हणाले होते.