IMD weather updat : शेवटी जे नको तेच घडणार, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज समोर, अत्यंत वाईट बातमी…

ऑगस्ट महिन्यातील पावसाचा पहिला अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) जारी करण्यात आला आहे. आयएमडीकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे आता चिंता वाढली आहे. पावसाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

IMD weather updat : शेवटी जे नको तेच घडणार, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज समोर, अत्यंत वाईट बातमी...
IMD Weather Update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 03, 2026 | 8:05 PM

भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनच्या सुरुवातीलाच यंदा पावसावर अल् निनोचं सावट आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. यंदा मान्सूनवर अल्  निनोचं सावट असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहील, काही भागांमध्ये अत्यल्प पावसाची शक्यता आहे, असंही भारतीय हवामान विभागाने म्हटलं होतं.  यंदा राज्यात उशिराने मान्सूनचं आगमन झालं, त्यानंतर जुनचे पहिले तीन आठवडे पाऊसच झाला नाही, त्यामुळे चिंता वाढली होती. परंतु त्यानंतर जूनच्या चौथ्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.  या पावसामुळे राज्यात पेरणीला वेग आला.

दरम्यान त्यानंतर जुलैच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पूर संकट देखील निर्माण झालं होतं. धरणांचा पाणीसठा वाढला. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सलग दहा दिवस पावसाने उघडीप दिल्याने पावसाआभावी पिकं सुकून चालली होती. शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु पुन्हा एकदा वीस जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढला. मात्र आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात 5 ऑगस्टनंतर पावसाचं प्रमाण कमी-कमी होत जाणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पावसावर अल् निनोचा प्रभाव पहायला मिळणार आहे.

काय आहे नवा अंदाज    

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात सहा टक्क्यांनी पावसाची वाढ, पहायला मिळत आहे.  पुढील दोन दिवस पुणे आणि कोकणात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  मराठवाडा आणि विदर्भात पावसाची जी तूट होती, ही तूट गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात भरून निघाली आहे, मात्र आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे  5 ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाणार आहे, असा अंदाज  पुणे विभागाचे हवामान तज्ज्ञ एस. डी सानप यांनी वर्तवला आहे.  ऑगस्टमध्ये पावसावर अल् निनोचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे, पावसाचं प्रमाण कमी -कमी होत जाण्याची शक्यता आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us