निफाडमध्ये 112 कोरोना रुग्णांवर, तर सिन्नरमध्ये 93 जणांवर उपचार सुरू

| Updated on: Nov 08, 2021 | 2:49 PM

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 872 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

निफाडमध्ये 112 कोरोना रुग्णांवर, तर सिन्नरमध्ये 93 जणांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः जिल्ह्यात सध्या 694 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यात निफाड येथील 112 आणि सिन्नरमधील 93 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 872 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 694 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांत नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 34, बागलाण 11, चांदवड 26, देवळा 27, दिंडोरी 21, इगतपुरी 8, कळवण 8, मालेगाव 4, नांदगाव 11, निफाड 112, पेठ 1, सिन्नर 93, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 4, येवला 37 अशा एकूण 398 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 252, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 34 रुग्ण असून एकूण 694 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 251 रुग्ण आढळून आले आहेत.

474 केंद्रावर लसीकरण सुरू

येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के कोरोना लसीकरण करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात विक्रमी लसीकरण करणाऱ्या नाशिक विभागात येत्या काळात या मोहिमेची गती अजून वाढणार आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात एकही डोस न घेतलेले किती जण आहेत, दुसरा डोस किती जणांचा राहिला आहे याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आज सोमवारपासून जिल्ह्यात तब्बल 474 केंद्रावर लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे.

लस घेण्यासाठी प्रोत्साहन

आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थ, लस घेण्यासाठी टंगळमंगळ करणारे, दुसरा डोस घेण्यासाठी इच्छुक नसणाऱ्या व्यक्तींचे आशा कर्मचारी, नगरपालिका आणि महापालिका आरोग्य कर्मचारी प्रोत्साह वाढवून त्यांना लस घेण्यासाठी तयार करणार आहेत. नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे येतात. त्यात अहमदनगर जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपर्यंत एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून, यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यात सध्या 694 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात निफाड 112, सिन्नर येथील 93 रुग्णांचा समावेश आहे. महानगरपालिका क्षेत्रात 252, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी (In Nifad, 112 corona patients are being treated and in Sinnar, 93 patients are being treated)

इतर बातम्याः

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांच्या नावांचा विचार; उत्सुकता शिगेला!

गोदाकाठी माय मराठी…साहित्य संमेलन गीताचे नाशिकमध्ये अनावरण