गोदाकाठी माय मराठी…साहित्य संमेलन गीताचे नाशिकमध्ये अनावरण

नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होत आहे.

गोदाकाठी माय मराठी...साहित्य संमेलन गीताचे नाशिकमध्ये अनावरण
नाशिकमध्ये साहित्य संमेलनाच्या गीताचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अनावरण केले.
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 1:18 PM

नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य समंलेनाची अतिशय उत्साहात आणि जोरात तयारी सुरू आहे. पालकमंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते सोमवारी संमेलन गीताचे अनावरण करण्यात आले.

अनंत आमुची ध्येयासक्ती अक्षरशक्ती अक्षरभक्ती गोदाकाठी मायमराठी ग्यानपर्वणी साहित्याची आली गोदाकाठी अभिमानाने गर्जा आता जय जय माय मराठी

असे साहित्य संमेलनाच्या गीताचे बोल आहेत. गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले असून त्यांना सौरभ कुलकर्णी, सागर कुलकर्णी मयुरी निमोणकर, मृदुला कुलकर्णी, श्रावणी गीते यांनी साथसंगत केली आहे. गीतासाठी मनोज गुरव यांनी बासरीवर, बल्लाळ चव्हाण यांनी तबाल्यावर साथसंगत केली आहे. मुंबईचे अविनाश लोहार यांनी संगीत संयोजन केले आहे. सुमंत गीते यांनी ध्वनिमुद्रकाची, शुभम जोशी यांनी मास्टरिंग म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या गीताचे ध्वनीमुद्रण नाशिकमधील राजीवनगर येथील सोर्स म्युझिक स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे.

गीताचे कौतुक

अनावरणानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या गीताचे तोंडभरून कौतुक केले. गीतकार, संगीतकार, गायक आणि सहकाऱ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. सध्या उद्घाटकांच्या नावावर विचार सुरू असून, लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. संमेलनाची अतिशय चांगली तयारी सुरू आहे. सर्वांची बडदास्त ठेवली जाईल, अशी माहिती यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

उदघाटकांच्या नावावर विचार सुरू

साहित्य संमेलनाचे उदघाटन कुणाच्या हस्ते करायचे याचा विचार सुरू आहे. गायिका आशा भोसले, गीतकार आणि कवी गुलजार यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. सोबतच महानायक अमिताभ बच्चन आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या नावांचाही विचार सुरू आहे. दरम्यान, साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनपूर्व गुरुवारी 02 डिसेंबर रोजी सायं. 7.00 वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संमेलनस्थळी करण्यात आले आहे. (All India Marathi Sahitya Sammelan Geeta unveiled in Nashik)

इतर बातम्याः

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांच्या नावांचा विचार; उत्सुकता शिगेला!

घरोघरी लसीकरणाला आजपासून नाशिकमध्ये सुरुवात; महानगरासह जिल्ह्यात राबवणार मोहीम, 474 केंद्रांची सोय

Non Stop LIVE Update
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.