घरोघरी लसीकरणाला आजपासून नाशिकमध्ये सुरुवात; महानगरासह जिल्ह्यात राबवणार मोहीम, 474 केंद्रांची सोय

नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून घरोघर लसीकरणाला सुरुवात करण्यात येत आहे. अनेक जणांनी लस घेण्याकडे पाठ फिरवली आहे, हे पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

घरोघरी लसीकरणाला आजपासून नाशिकमध्ये सुरुवात; महानगरासह जिल्ह्यात राबवणार मोहीम, 474 केंद्रांची सोय
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 10:27 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून घरोघर लसीकरणाला सुरुवात करण्यात येत आहे. अनेक जणांनी लस घेण्याकडे पाठ फिरवली आहे, हे पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के कोरोना लसीकरण करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात विक्रमी लसीकरण करणाऱ्या नाशिक विभागात येत्या काळात या मोहिमेची गती अजून वाढणार आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात येत आहे. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी 22 ऑक्टोबर अखेर कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले होते. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

विभागातही आघाडी

नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे येतात. त्यात अहमदनगर जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपर्यंत एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून, यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 14 लाख 32 हजार 592 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 09 लाख 79 हजार 876 जणांनी पहिला डोस घेतला असून 04 लाख 52 हजार 716 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 27 लाख 09 हजार 094 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 20 लाख 36 हजार 779 जणांनी पहिला डोस घेतला असून 06 लाख 72 हजार 315 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 10 लाख 28 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 07 लाख 710 जणांनी पहिला डोस घेतला असून 03 लाख 27 हजार 292 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

लसवंचितांची माहिती गोळा करणे सुरू

नाशिक जिल्ह्यात एकही डोस न घेतलेले किती जण आहेत, दुसरा डोस किती जणांचा राहिला आहे याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आज सोमवारपासून जिल्ह्यात तब्बल 474 केंद्रावर लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थ, लस घेण्यासाठी टंगळमंगळ करणारे, दुसरा डोस घेण्यासाठी इच्छुक नसणाऱ्या व्यक्तींचे आशा कर्मचारी, नगरपालिका आणि महापालिका आरोग्य कर्मचारी प्रोत्साह वाढवून त्यांना लस घेण्यासाठी तयार करणार आहेत.( Corona vaccination at home in Nashik from today, arrangement of 474 centers in the district.)

इतर बातम्याः

राज्यभर पाखरमाया; महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून पक्षी सप्ताहाचे आयोजन

चोरट्यांचा दिवाळीबारः नाशिकमध्ये घरफोडी करून मोत्याचा हार, सोन्या-चांदीचे दागिने, ताट-वाट्या लंपास

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.