राज्यभर पाखरमाया; महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून पक्षी सप्ताहाचे आयोजन

मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देण्याकरिता व डॉ. सालिम अली यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभर पाखरमाया; महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून पक्षी सप्ताहाचे आयोजन
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 3:16 PM

नाशिकः निसर्ग मित्र मंडळ आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे राज्यभर पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात विविध कार्यक्रम होणार आहेत.

पक्ष्यांचे संवर्धन करणे, संरक्षण करणे तसे भारतीय पशीविश्व आणि पक्षी अभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहचवण्याचे काम पैगंबरवासी डॉ. सालिम अली यांनी केले. तर महाराष्ट्रातील तमाम पक्षी निरीक्षकांसाठी कायम आदराचे असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मारुती चितमपल्ली. या दोघांचाही महाराष्ट्रातील पक्षीविश्वाशी खूप जवळचा संबंध आहे. खरे तर त्यांनी रचलेल्या पायावरच आज महाराष्ट्रातील पक्षीमित्र वाटचाल करीत असतात. योगायोगाने या दोहोंचा जन्मदिवस हा नोव्हेंबर महिन्यात येतो. त्यात मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन 5 नोव्हेंबर असून, पै. डॉ. सालिम अली यांची जयंती 12 नोव्हेंबरला असते. हा योगायोग साधून मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देण्याकरिता व डॉ. सालिम अली यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 5 नोव्हेंबर ते उद्या 12 नोव्हेंबर पर्यंत हा पक्षीसप्ताह साजरा होत आहे.

असे आहेत कार्यक्रम

2017 मध्ये राज्यात पहिल्यांदा पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहामध्ये जवळपास 22 जिल्ह्यात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे झाले. यावर्षी सुद्धा निसर्ग मित्र मंडळ तसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे आजीवन सभासद, संलग्नित संस्था, महाराष्ट्रात राज्यभर विखुरलेले पक्षीनिरीक्षक आणि पक्षी विषयक कार्यरत महाराष्ट्रातील संस्था हा सप्ताह विविध कार्यक्रम, पक्षी अभ्यास, निरीक्षण सहली, व्याख्याने, सादरीकरणे, असे कार्यक्रम घेऊन साजरा करत आहेत.

पक्षीशास्त्राच्या अभ्यासात भर

पक्षी सप्ताहामुळे सालीम अली आणि मारुती चितमपल्ली या थोर व्यक्तींच्या कार्याचा नवीन पिढीस परिचय होईल. त्यामुळे नवीन परीनिरीक्षक तयार होतील. त्यातून पक्षीशास्त्राच्या अभ्यासात भर पडण्यास मदत होईल. पक्षीनिरीक्षण, छायाचित्रप्रदर्शन, कार्यशाळा, शार्टफिल्म, माहितीपट प्रदर्शन, पक्षीतज्ज्ञांशी चर्चा-मुलाखत, पाणथळ स्वच्छता मोहीम, बर्डरेस, नायलॉन मांजा संबंधी जनजागृती, बर्ड फेस्टिव्हल, बर्डथीम घेऊन छोटया मुलांसाठी आर्टस् आणि क्राफट्स असे उपक्रम महाराष्ट्रात या दरम्यान होत आहेत.

निसर्ग मित्र मंडळाचा पुढाकार

निसर्ग मित्र मंडळातर्फे या सप्ताहात पक्ष्यांची ओळख, घरटी बनवा कार्यशाळा तसेच निसर्ग व्हॅली, सुखना मध्यम प्रकल्प अभयारण्य तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी पक्षी अभ्यास प्रश्न मंजुषा आदी उपक्रम होत आहेत. त्याच प्रमाणे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात भिगवण, नाथसागर जायकवाडी पक्षी अभयारण्य, गौताळा अभयारण्य तसेच नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य येथे पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त निसर्ग प्रेमींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. सालिम अली, मारुती चितमपल्ली सर यांचे काम नव्या पिढीला माहिती व्हावे आणि पक्षीशास्त्राच्या अभ्यासात भर पडावी म्हणून राज्यभर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तरुण मुले आमच्यासोबत जोडले जात आहेत. याचा आनंद वाटतो. – किशोर गठडी, सदस्य, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना

(Bird Week organized by Maharashtra Pakshimitra Sanghatana across the state)

इतर बातम्याः

तब्बल 500 कोटींची बिले थकल्याने नाशिक पालिकेचा तोळामासा; अवघ्या 98 कर्मचाऱ्यांवर मदार

शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर नाशिकमध्ये चॉपरने हल्ला; जखमींची प्रकृती चिंताजनक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.