भारत हा दुसऱ्यांना जोडणारी शक्ती, आता वेळ आलीये.., मोहन भागवत यांचं स्वयंसेवकांना मार्गदर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-२’चा समारोप कार्यक्रम आज नागपूरच्या रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये  सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं आहे.

भारत हा दुसऱ्यांना जोडणारी शक्ती, आता वेळ आलीये.., मोहन भागवत यांचं स्वयंसेवकांना मार्गदर्शन
Mohan Bhagwat
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 10:21 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-२’चा समारोप कार्यक्रम आज नागपूरच्या रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये  सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं आहे.  युद्ध दुसऱ्या देशांमध्ये होत आहेत. मात्र तेलाची किंमत आपल्या देशात वाढत आहे, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. भारताची आता वेळ आली आहे, जगाल आता भारताची आवश्यकता आहे, कारण भारत हा दुसऱ्यांना जोडण्यारी शक्ती आहे, असं यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत? 

ज्यांचा संबंध नाही असेही देश अमेरिका -इराण युद्धात पिसत चाललेले आहेत. संकट आहेत त्याकडे माणसाचं ध्यान जात नाही. आपण विकास आणि स्वार्थामध्ये फसलो आहोत. भारत कधीकाळी विश्वगुरू होता, हजारो वर्षे आम्ही गुलामगिरी केली,  ज्यांनी आमच्यावर राज्य केले ते आमच्यापेक्षा चांगले कधीच नव्हते. हिंदुत्वाच्या जागरणाचा प्रयत्न स्वामी विवेकानंद दयानंद महर्षी यांच्यापासून सुरू आहे.  आज आमच्या कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास जगभरात करण्यात येत आहे. आता भारताची वेळ आलेली आहे,  मात्र केवळ वेळ देऊन चालणार नाही त्या वेळेसाठी तयार व्हावं लागतं.  भारत विश्वगुरू आहे, मात्र आमची तयारी कुठे आहे?  असा सवाल यावेळी मोहन भागवत यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याला आता जगाला नवीन मार्ग द्यावा लागेल.  जगाची कॉपी करून चालणार नाही, तर आपल्याला नवा मार्ग तयार करावा लागेल आणि परिश्रम करावे लागणार आहेत. संघाचं नाव समाजाने घेतलं नाही तरी चालेल, परंतु देश, धर्म आपला प्राण आहे. ज्यांच्याजवळ शक्ती आहे त्यांचं जग ऐकतं, लाठी आहे म्हणून जग ऐकतं.
भारताला स्वतः उभा राहावं लागेल, जगाला मार्ग दाखवावा लागेल.  आपली भिस्त ही वसुधैव कुटुंबकम ही आहे. त्यामुळे केवळ दर्शक बनवून राहू नका, संघात या, संघाला समजून घ्या आणि प्रत्यक्ष संघाच्या कार्यक्रमात असा गणवेश घालून सहभागी व्हा,  संघाच्या कार्यक्रमात हितेशी म्हणून तुम्ही सहभागी होऊ शकता,  आता वेळ आलेली आहे की आपल्याला राष्ट्राच्या आणि जगाच्या हितासाठी सक्रिय व्हावं लागे, असं आवाहन यावेळी मोहन भागवत यांनी केलं आहे.

 

 

Follow Us