Maharashtra Weather Update : आजही तो कोसळणार.. IMD कडून मोठा इशारा, विदर्भात धोका अधिक, 24 तासात..

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. आज राज्यातील अनेक भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.

Maharashtra Weather Update : आजही तो कोसळणार.. IMD कडून मोठा इशारा, विदर्भात धोका अधिक, 24 तासात..
Maharashtra Weather
| Updated on: Aug 05, 2026 | 7:19 AM

राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. पाऊस कमी अधिक प्रमाणात कोसळत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुणे आणि रायगड येथील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल. पावसाचा आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मॉन्सूनचा कमी दाबाचा मोठा पट्टा निर्माण झाला. ईशान्य राजस्थान आणि दक्षिण कर्नाटमध्ये 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. नाशिक, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, गोदिंया, चंद्रपूर, गडचिरोली या भागाता पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

जून महिना कोरडा गेला असला तरीही जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. आता ऑगस्ट महिन्यातही पावसाने धमाकेदार हजेरी लावली. सतत पाऊस कोसळत आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अत्यंत महत्वाचा आहे. राज्यातील जवळपास धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न जवळपास मिटला आहे. एल निनोचा कोणताही प्रभाव मॉन्सूनवर होत नाहीये.

सिंधुदुर्ग दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेय. तिलारी नदी काठच्या बऱ्याच गावांचा संपर्क तुटलाय. घोटगे परमे, घोटगेवाडी, कुडासे, आदी पुलावर तसेच तालुक्यातील छोट्या मोठ्या कॉजवेवर पाणी आल्याने तालुक्याशी या गावातील संपर्क तुटलाय. तिलारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तिलारी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

हवामान विभागाने आज भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला असताना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झालेला होता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही, असेही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना हा पाऊस त्यांच्यासाठी समाधानकारक ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us