Monsoon update : या दिवसापासून महाराष्ट्रात धो धो पाऊस, संकट अजूनही कायम, अरबी समुद्रात मॉन्सून..

Weather update : मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा आहे. 15 जूनला राज्यात दाखल होणाऱ्या मॉन्सूनचा दूरपर्यंत काहीच पत्ता नाही. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आता मोठा इशारा दिला. राज्यात मॉन्सून नक्की कधी दाखल होईल, हे सांगितले आहे.

Monsoon update : या दिवसापासून महाराष्ट्रात धो धो पाऊस, संकट अजूनही कायम, अरबी समुद्रात मॉन्सून..
monsoon rain
| Updated on: Jun 15, 2026 | 7:16 AM

15 जून 2026 पासून राज्यात पावसाचा अंदाज होता. मात्र, मॉन्सूनने पुन्हा एकदा दिशा बदलली. मॉन्सून अरबी समुद्रात आहे. अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल थांबलीये. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वादळ्याने मॉन्सूनला पुढे येण्यास अडथळा निर्माण झाला. जोपर्यंत हे वारे जाणार नाही, तोपर्यंत मॉन्सूनची स्थिती जैसे थे असणार. 20 जूनला मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, 11 जून त्यानंतर 15 जून आणि आता थेट 20 जून म्हटल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. पेरण्या रखडल्या असून पाणी पातळी खाली जात आहे. त्यामध्येच एल निनोचे मोठे संकट राज्यावर आहे. यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना जोपर्यंत आवाहन केले जात नाही, तोपर्यंत पेरण्या करण्यास मनाई केली. यामुळे दुबार पेरणीचे संकटच राहणार नाही.

20 जूनला राज्यातील जवळपास भागात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात उष्णता प्रचंड वाढताना दिसत आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने ते एक वेगळे संकट आहे. एल निनोचा प्रभाव पावसावर असेल. ज्यामुळे अनेक भागात पाऊस कमी होऊ शकतो. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक हवामान संस्थांनी अगोदरच धोक्याचा इशारा दिला आहे.

मॉन्सूनच्या वाऱ्याने पश्चिम बंगालच्या काही भागात प्रगती केली. झारखंडमध्येही हजेरी लावली. मात्र, अरबी समुद्रात गेल्या आठ दिवसांपासून स्थिती एकसारखीच आहे, त्यात काहीच प्रगती नाही. पुढील 4 ते 5 दिवसात मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे.

मॉन्सून राज्यात येण्यास उशिर लागणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्ण तयारी करून घेतली आहे. मॉन्सून सतत लांबणीवर पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता आहे. पेरण्या रखडल्या आहेत. 20 जूनला पावसाची अपेक्षा आहे. काही भागात अजूनही वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. अनेक अंदाज पावसाबद्दल सध्या वर्तवले जात आहेत.

Follow Us