AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon update : या दिवसापासून महाराष्ट्रात धो धो धो धो पाऊस, 15 जून नाहीच, मॉन्सूनचे मोठे अपडेट

Monsoon Update : राज्यात मॉन्सून 15 जूनला दाखल होणार होता. मात्र, यादरम्यानच आता मॉन्सूनबद्दल मोठी अपडेट आहे. मॉन्सून अरबी समुद्रात रेंगाळला आहे. आता मॉन्सूनची नवीन तारीख पुढे आली आहे. अजून काही दिवस मॉन्सूनच्या पावसासाठी वाट बघावी लागणार आहे.

Monsoon update : या दिवसापासून महाराष्ट्रात धो धो धो धो पाऊस, 15 जून नाहीच, मॉन्सूनचे मोठे अपडेट
Monsoon update
| Updated on: Jun 14, 2026 | 8:34 AM
Share

राज्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. राज्यात पाऊस लांबणीवर पडताना दिसत आहे. 11 जूनपर्यंत राज्यात मॉन्सून दाखल होतो. मात्र, यंदा 11 जून उलटूनही पावसाचा पत्ता नाही. 15 जूनपर्यंत राज्यात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल पुढे होत नाही. राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने मॉन्सूनवर सावट आहे. यादरम्यानच आता मॉन्सूनची नवीन तारीख जाहीर करण्यात आली. मुंबईसह राज्यभरात 20 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे चिंता अधिक वाढली. अफगाणिस्तानातील वाऱ्याने म़ॉन्सूनची वाट अडवली असल्याचे सांगितले जात आहे. कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर मॉन्सून राज्यात दाखल होणार. आता मॉन्सून राज्यात दाखल होण्याची नवी तारीख 20 जून आहे.

कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की, पुन्हा मॉन्सूनच्या पुढील वाटचालीचा प्रवास सुरू होईल. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात एकूण पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यास अर्थेय शेट्टी यांनी हा अंदाज दिला. कोकण, गोवा, आणि मराठवाड्यात 19 जूनदरम्यान केवळ काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पडू शकतो.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह वारे वाहण्याची शक्यता आहे. 17 जूनपर्यंत विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. म्हणजेच जो 15 जूनला राज्यात मॉन्सून दाखल होणार होता, तो आता 20 जूला दाखल होईल.

यंदा राज्यात पाऊस कमी पडणार असल्याचा अगोदर अंदाज वर्तवण्यात आला. त्यामध्येच मॉन्सूनची वाटचाल पुढे संथगतीने सुरू आहे. केरळमध्ये दोन दिवस उशिराने मॉन्सून दाखल झाला. मात्र, त्यानंतर अजूनही त्याचा पत्ता नाही. एस निनोचा प्रभाव मॉन्सूनवर आहे. सरकारकडून यादरम्यानच योग्य ती पाऊले या पार्श्वभूमीवर उचचली जात आहेत. मॉन्सूनची तारीख पुढे ढकलली जात असल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता