AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यासाठी धोक्याची घंटा, मॉन्सूनची स्थिती जैसे थे, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, 15 जून नाही तर..

Weather update : भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. ज्यामुळे राज्यातील मॉन्सूनवर परिणाम होणार आहे. 15 जूनला राज्यात मॉन्सूनच्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, आता धोक्याचा इशारा आहे.

राज्यासाठी धोक्याची घंटा, मॉन्सूनची स्थिती जैसे थे, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, 15 जून नाही तर..
monsoon
| Updated on: Jun 14, 2026 | 7:20 AM
Share

मुंबईसह राज्यात 15 जूनपासून मॉन्सूनच्या पावसाला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. मात्र, यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. एल निनोमुळे थेट मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होऊ शकतो. विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. जून महिन्याच्या 14 तारखेला थेट उष्णतेचा इशारा दिला जात आहे. राज्यातील पेरण्या रखडल्या आहेत. मॉन्सूनचा दूरपर्यंत काही पत्ता नाही. त्यामध्येच एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर दिसत आहे. जगातील अनेक हवामान संस्था गंभीर इशारा देत आहेत. उद्यापासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस मॉन्सूनचा बरसण्याची शक्यता आहे. मॉन्सून बंगालसह बिहारच्या काही भागात प्रगती करत आहे. ओडिसासह झारखंडच्या भागात मॉन्सूनने हजेरी लावली. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सून काही पुढे सरकताना दिसत नाही. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीकरिता वाट पाहवी लागणार आहे. मॉन्सूनच्या वाटचालीकरिता अडथळा येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा इशार देण्यात आला.

अरबी समुद्रातील मॉन्सूनची वाटचाल बघता राज्याला मॉन्सूनच्या पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. शिवाय यंदा राज्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज आहे. मॉन्सूनचा पाऊस पुढे वाटचाल करत नसल्याने मोठे संकट उभे आहे. राज्यात पेरण्या रखडल्या असून शेतकरी राजा चिंतेत आहे.

जुनचा दुसरा आठवडा संपत आला आहे.  पण अजूनही आभाळाने दार उघडलेलं नाही. पावसाचा एकही थेंब जमिनीवर पडलेला नाही. इकडे शेतकऱ्याने मात्र आशेच्या भरवशावर शेत तयार करून ठेवले आहेत. मशागत पूर्ण केली, खत-बियाणे घरात आणून ठेवले, पण आभाळाकडे पाहणारे त्याचे डोळे अजूनही प्रतीक्षेतच आहे. कारण बळीराजासाठी पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही… तर त्याच्या संसाराचा श्वास आहे.

याच पावसावर लेकरांच्या शिक्षणाची स्वप्नं अवलंबून आहेत. मुला-मुलींच्या लग्नाची जबाबदारी अवलंबून आहे. घरखर्च, दवाखाना आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा अवलंबून आहे. त्यामध्येच कृषी विभागाने जोपर्यंत आवाहन केले जाणार नाही, तोपर्यंत पेरण्या करू नये, असे आवाहन केले आहे. ज्यामुळे दुबार पेरणीचे संकट राहणार नाही.

Follow Us
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा