AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉन्सूनबाबत मोठी बातमी! पुढील 10 तास 15 राज्यात मुसळधार पाऊस, IMD चा मोठा इशारा..

मॉन्सून लांबणीवर पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यंदा राज्यात मॉन्सून रेंगाळल्याचे बघायला मिळत आहे. मॉन्सून पुढे सरकत नाहीये. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. आज काही राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे.

मॉन्सूनबाबत मोठी बातमी! पुढील 10 तास 15 राज्यात मुसळधार पाऊस, IMD चा मोठा इशारा..
Meteorological Department warning
| Updated on: Jun 12, 2026 | 7:42 AM
Share

मॉन्सूनचा पाऊस रेंगाळला आहे. मात्र, दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. 12 आणि 13 जून रोजी उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. काही भागात उष्णता राहण्याचीही शक्यता आहे. राज्यात अजूनही अपेक्षित मॉन्सून दाखल झाला नाही. अवकाळी पाऊस थोड्याबहुत प्रमाणात कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने 15 राज्यांमध्ये पुढील 10 तासांकरिता वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. यादरम्यान नागरिकांनी काही काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात. ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे असेल. 5 राज्यात गारपिटीचा इशारा आहे. यामुळे पुढील 10 तास अत्यंत धोक्याची असणार आहेत.

राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा अंदाज आहे. तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरू असून पुढील तीन दिवसांत राज्यातील अंतर्गत भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ़ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची नोंद झाली असली तरीही मुंबईसह उत्तर कोकणात उष्मा कायम आहे.

मुंबईत उष्ण, दमट वातावरण मुंबईसह पालघर आणि ठाणे येथे गुरुवारी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. हवामान विभागाच्या कुलाबा येथे 36 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे 35.3 अंश सेल्सिअस आणि दोन्ही केंद्रावर किमान तापमान 30 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मुंबईत मोसमी पाऊस दाखल होण्याची सरासरी तारीख 10 ते 11 जून मानली जाते. मात्र, स्थिती अनुकूल नसल्याने तो लांबण्याची चिन्हे आहेत. 18 जूनपर्यंत मॉन्सून पूर्णपणे राज्यात दाखल होण्याचा अंदाज आहे.

राज्यात मॉन्सूनचा पाऊस येण्याकरिता अजून काही दिवसांची वाट पाहवी लागणार आहे. मॉन्सूनला पुढे सरकण्याकरिता पोषक वातावरण मिळत नाहीये. मॉन्सून लांबणीवर पडत असल्याने शेतकरी देखील चिंतेत आहेत. पावसाची वाट बघितली जात आहे. पेरण्या रखडल्या आहेत. चाळीसगाव तालुक्यात मान्सूनपूर्व शेती कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर मारून शेत पेरणीसाठी सज्ज करत आहेत.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर