AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा; राज्यात मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर, पुढील 3 ते 4 दिवसात..

मॉन्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाला. मात्र, त्यानंतर चांगली वाटचाल केली. आता मॉन्सून रेंगाळताना दिसत आहे. राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता उशिरा लागत आहे. ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पेरण्या रखडल्या आहेत.

मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा; राज्यात मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर, पुढील 3 ते 4 दिवसात..
Monsoon
| Updated on: Jun 11, 2026 | 8:09 AM
Share

राज्यात मोसमी पाऊस लांबणीवर पडला आहे. ज्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.  पुढील 3 ते 4 दिवसात आणखीन काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. देशातील ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोमसी पावसाने वाटचाल केली आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यात मॉन्सूनचा पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून मॉन्सूनचा पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सून पुढे सरकत नसल्याने एक संकट निर्माण झाले. त्यामुळे राज्यात मॉन्सूनचा पाऊस काहीसा लांबण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील इतर भागात मॉन्सून पाऊस दाखल होण्याची स्थिती अनुकूल आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणासह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस दाखल होण्याचा सरासरी कालावधी हा साधारणपणे 7 ते 11 जून मानला जातो.

राज्यात वादळी पावसाचा प्रभाव कमी होणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र, आजही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील काही भागात मॉन्सून दाखल झाला असून काही भागात मान्सून पूर्व पावसाची नोंद होत असून जवळपास भागात वादळी पावसाची स्थिती आहे. पुढील काही दिवसात राज्यातील वादळी पावसाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मान्सूनची वाटचाल संथगतीने होत असून पुढील 3 ते 4 दिवसात राज्याच्या आणखीन काही भागात मान्सून दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सध्या दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची नोंद होत आहे.  मुंबईतही नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे.

मॉन्सून 6 जून रोजी तळकोकणात दाखल झाला असून सध्या मॉन्सूनची उत्तर सीमा कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरमधील काही भागात स्थिर आहे. मॉन्सूनची राज्यातील वाटचाल काहीशी संथगतीने सुरु असून पुढील काही दिवस नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भातही पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवत असून शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई शहरात अद्याप पावसाची इंट्री झाली नाहीये. प्रचंड ऊकाडा आणि हवेतील आर्द्रता वाढल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. आज उपनगरांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...