AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : वैभव सूर्यवंशी OUT? भारताच्या माजी दिग्गजाने निवडली टॉप ऑर्डर; ‘या’ 3 खेळाडूंना संधी, कोण कोण?

अफगाणिस्तान विरुद्ध भारत या टी20 मालिकेला उद्या सुरुवात होणार आहे. यामध्ये खेळण्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन नेमकी काय याकडे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी आता अजिंक्य रहाणनेने टॉप ऑर्डरबद्दल त्याचे मत मांडलं आहे.

IND vs AFG : वैभव सूर्यवंशी OUT? भारताच्या माजी दिग्गजाने निवडली टॉप ऑर्डर; ‘या’ 3 खेळाडूंना संधी, कोण कोण?
Vaibhav Sooryavanshi out Sanju in ajinkya rahane Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 4:53 PM
Share

अफगाणिस्तान विरुद्ध भारताची तीन टी20 सामन्यांची मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. उद्या 13 सप्टेंबर रोजी पहिला सामना दिल्लीमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे उद्याच्या या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन काय असणार याकडे भारताच्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, भारताच्या टॉप ऑर्डरबद्दल नेहमीच विविध चर्चा असतात. कोण खेळणार कोण नाही यावरुन विविध मतमतांतर असतात. जेव्हापासून वैभव सूर्यवंशीचे आंतराष्ट्रीय पदार्पण झाले आहे, तेव्हापासून तर हा प्रश्न अधिक किचकट झाला आहे. पण भारताचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने आता वैभव सूर्यवंशीला सध्या टॉप ऑर्डरमध्ये स्थान देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे.

त्याने यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितलं की, भारताला आयसीसी टी20 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेलाडूंसोबतच पुढे जायला पाहिजे. रहाणेने संजू सॅमसनला खेळवावे असं म्हटलं आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन हेच टॉप ऑर्डरमध्ये असावेत असं त्याने म्हटलं आहे.

संजूबद्दल अजिंक्य म्हणाला की, संजूने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे काही डावांतील खराब कामगिरीनंतर त्याला संघाबाहेर बसवणं हे काही योग्य नाही. संजू हा विकेटकीपर आहे. सोबतच तो चांगला फलंदाजही आहे. त्यामुळे त्याचा फायदा संघाला नक्कीच होऊ शकतो. याशिवाय त्याने इशान किशन आणि अभिषेक शर्माबद्दलही असंच म्हटलं आहे.

दरम्यान, वैभवने सूर्यवंशीने झिम्ब्वाम्बेविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. त्याने दोन अर्धतकं ठोकले. तसेच तो प्लेअर ऑफ द सीरीजही बनला. त्यानंतरही त्याला संघाबाहेर ठेवावं असं अजिंक्य म्हणाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पण अजिंक्यचं म्हणणं आहे की, वैभव हा नवा खेलाडू आहे. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्याला पुढे संधी मिळणार आहे. परंतू आता संघासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होता कामा नये.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक) तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, आणि यश ठाकूर

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर