Instagram चं latest फिचर, अपडेट होताच प्रोफाइल दिसेल आकर्षक, कसं वापरायचं?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतो. आता कंपनीने प्रोफाइल अधिक आकर्षक आणि पर्सनलाइज करण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतो. आता कंपनीने प्रोफाइल अधिक आकर्षक आणि पर्सनलाइज करण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अपडेटच्या मदतीने यूजर्सना दुसऱ्यांनी टॅग केलेले आवडते फोटो आणि पोस्ट आपल्या मुख्य प्रोफाइल ग्रिडवर दाखवता येणार आहेत. त्यामुळे प्रोफाइलवर दिसणाऱ्या कंटेंटवर यूजर्सचे नियंत्रण आणखी वाढणार आहे.
आतापर्यंत एखाद्या व्यक्तीने आपल्याला फोटो किंवा व्हिडीओमध्ये टॅग केल्यास तो कंटेंट प्रोफाइलवरील Tagged सेक्शनमध्ये दिसत होता. मात्र, आवडलेला फोटो मुख्य ग्रिडवर आणण्यासाठी थेट पर्याय उपलब्ध नव्हता. नवीन फीचरमुळे ही अडचण दूर होणार आहे. या फिचरमुळे आता आपल्याला टॅग केलेल्या आणि आवडलेला कंटेन्ट थेट प्रोफाइलवर आणता येईल.
हे फीचर कसे वापरायचे?
सर्वप्रथम Instagram अॅप उघडा.
सर्वप्रथम आपल्या मोबाइलमध्ये Instagram अॅप सुरू करा आणि प्रोफाइल सेक्शनमध्ये जा.
Tagged सेक्शन निवडा
यानंतर प्रोफाइलवर असलेल्या Tagged टॅबवर क्लिक करा. येथे तुम्हाला इतरांनी टॅग केलेले फोटो आणि व्हिडीओ दिसतील.
आवडता फोटो उघडा
मुख्य प्रोफाइल ग्रिडवर दाखवायचा असलेला फोटो किंवा पोस्ट निवडा. त्यानंतर उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये प्रोफाइलवर जोडण्याची सुविधा शोधा.
मेन ग्रिडवर फोटो ॲड कसा करावा?
फोटोसाठी दिलेल्या Add to Profile Grid किंवा त्यासारख्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर निवडलेली पोस्ट तुमच्या मुख्य प्रोफाइल ग्रिडवर दिसू शकते.
प्रोफाइलवर कासा तापासावा?
फोटो जोडल्यावर आपल्या प्रोफाइलच्या मुख्य ग्रिडमध्ये तो कंटेंट दिसत आहे का, हे तपासा. या सुविधेमुळे यूजर्सना स्वतःचे फोटो आणि टॅग केलेल्या आवडत्या पोस्ट एकाच ठिकाणी मांडता येतील. फीचर उपलब्धता अॅपच्या आवृत्ती आणि अकाउंटनुसार वेगळी असू शकते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टग्रामने यूजर्ससाठी आणलेले हे नवीन फीचर प्रोफाइल पर्सनलाइज करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेमुळे टॅग केलेल्या आवडत्या फोटो आणि पोस्ट मुख्य प्रोफाइल ग्रिडवर दाखवता येणार आहेत. त्यामुळे प्रोफाइल अधिक आकर्षक दिसण्यासोबतच कोणता कंटेंट दाखवायचा, यावर यूजर्सचे नियंत्रण वाढणार आहे.
