AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Graduates Constituency Result Update : सात ते आठ मतपेट्यांच सील तुटलेलं, ते कोणाचं मतदान आहे हे.. मतमोजणीआधीच पुण्यात राडा

Pune Graduates Constituency Result Update : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला. निवडणूक अधिकारी आणि मतदार प्रतिनिधीमध्ये वादावादी झाली. भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यामध्ये आहे.

Pune Graduates Constituency Result Update : सात ते आठ मतपेट्यांच सील तुटलेलं, ते कोणाचं मतदान आहे हे.. मतमोजणीआधीच पुण्यात राडा
Pune Graduates Constituency Result Update
| Updated on: Oct 27, 2026 | 9:50 AM
Share

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला. निवडणूक अधिकारी आणि मतदार प्रतिनिधीमध्ये वादावादी झाली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रतिनिधीने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. “आमच्या तक्रारीला अर्थ नाही. सगळ्या उमेदवारांनी आक्षेप घेतला. सात ते आठ मतपेट्यांच सील निघालेलं होतं” असा दावा या प्रतिनिधीने केला. “अधिकारी तिथे आले. त्यांनी बघितलं. प्रोसीड म्हणाले. सात ते आठ मतपेट्यांच सील तुटलेलं. ते कोणाचं मतदान आहे माहिती नाही. ते परमेश्वराला, मतदारराजाला माहितीय. मतपेटीचं सील तुटणं ही गंभीर बाब आहे. त्या सील तुटलेल्या पेट्या बाजूला ठेऊन मतमोजणी करावी. सात ते आठ मतपेट्यांच सील तुटलेलं आहे. सील तुटलेल्या मतपेट्या बाजूला ठेऊन पारदर्शकपणे मतमोजणी करावी” अशी हर्षदा देशमुख यांच्या प्रतिनिधीची मागणी आहे.

पुण्यात पदवीधरमध्ये मुख्य लढत भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यामध्ये आहे. ठाकरे गटाकडून सुनील मोदी रिंगणात आहेत. पदवीधर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 62.78 टक्के आहे. मतदानासाठी पात्र असलेल्या पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बालेवाडी येथे ही मतमोजणी होत आहे. 23 ऑक्टोंबरला पुणे पदवीधरसाठी मतदान झालं होतं. डॉ. स्मिता जाधव की हर्षदा देशमुख-जाधव, यापैकी कोणाला मतदारांचा कौल मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या निकालाकडे सगळ्यांच लक्ष असेल

पुणे पदवीधरचा निकाल भाजपच्या बाजूने लागेल अशी चर्चा आहे. पण निकाल उलट लागला, तर राज्यात वातावरण बदलतय, मतदारराजा वेगळा विचार करत असल्याचाही संदेश जाईल. कारण पदवीधरमध्ये मतदान करणारे सुशिक्षित, उच्चशिक्षित मतदार असतात. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांच लक्ष असेल. पुणे शिक्षकची जागा जास्त चर्चेत राहिली. कारण इथून आधी एकनाथ शिंदे शिवसेनेने मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली होती. नंतर त्यांनी माघार घेतली. शिवसेनेने आता सचिन सानप या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तिथे भाजप-शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत!
Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा
महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला
Maharashtra MLC Election Results 2026 : महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला? निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा