सापाला घरातून हाकलण्यासाठी घरातील ही छोटीशी गोष्ट करेल मदत, काहीच वेळातच कोसो दूर पळेल
अनेकदा घरात शिरलेल्या सापाला बाहेर कसे काढावे असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी काही घरगुती उपाय करावेत. हे उपाय काय आहेत? चला जाणून घेऊया...

सामान्यतः ग्रामीण भागात कच्च्या घरांमध्ये साप शिरल्याचे पाहायला मिळते. मातीची जमीन, कौलाच्या छतामुळे घरातील गारव्यामुळे कच्चा घरांमध्ये साप शिरतात. साप एकदा घरात शिरला तर त्याला बाहेर काढणे कठीण होते. कारण सापाला थंडावा हवा असतो. यामुळे ते घरात कुठेही लपून राहतात. अशा वेळी तो सुरक्षित जागा समजून तिथून पळण्याचे नावही घेत नाही. पण काही घरगुती उपाय आहेत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही सापाला सहज हाकलू शकता. चला जाणून घेऊया या घरगुती उपायाबद्दल…
घरात जर साप लटकला असेल किंवा ग्रामीण भागात मातीच्या घरात साप दिसला असेल तर तुम्ही जाताच तो लपण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी त्याला मारायचे नाही आणि त्याला अजिबात त्रास द्यायचा नाही. त्याची छेड काढायची नाही. फक्त काही मिनिटांत हा घरगुती उपाय केल्याने सापाला तुम्ही हाकलून लावू शकता. या घरगुती नुस्क्याने साप स्वतःच पळून जाईल. होय! साप आपोआप दूर पळेल.
सापाला पळवण्यासाठी काय करावे?
यासोबतच साप तुमचे काहीही नुकसानही करणार नाही. सापाला हाकलण्यासाठी सर्प मित्राने काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितले की या देशी घरगुती उपाय केल्यामुळे विषारी साप एका झटक्यात पळून जाईल. पुन्हा कधीही साप घराच्या आसपास पण भटकणार नाही. सापा जिथे दडा धरून बसला आहे तिथे लाखेच्या काड्या जाळा. त्याच्या धुरामुळे आणि वासाने साप पळून जातो. याशिवाय मोहरी, कागद, कपडा, लाल मिरचीही जाळली जाते. हे सर्व केल्यानेही साप निघून जातो. या घरगुती उपायाने साप घरातून बाहेर पडून पळून जातो. सोबतच कोणालाही काही नुकसानही पोहोचवू शकत नाही.
बिळात साप असेल तर असा काढा बाहेर
अनेकदा असे दिसते की कधी साप घरात पंख्यावर लटकलेला असतो, कधी बिळात येतो किंवा कौलारू घर असेल तर त्यातही साप लटकलेला असतो. अशा वेळी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. फक्त धैर्याने ही घरगुती ट्रिक वापरून तुम्ही सापाला सहज हाकलू शकता. या उपायाने साप काही सेकंदांत घरातून गायब होतो. यासोबतच साप जर बिळात असेल तरीही तो बाहेर येऊन पळून जाईल. पण अगदी हे जाळताना काही मर्यादेतच लाखेच्या काड्या, मिरची, कागद, कापड यांचा वापर करावा.
