महाराष्ट्रात परतीचा पाऊस झोडपणार, मोठा इशारा, अलर्ट जारी, 24 तासात तब्बल..

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा अनेक भागात दिला. कमी दाबाचा क्षेत्र तयार झाल्याचे बघायला मिळतंय. परतीचा पाऊस धुमाकूळ घालतोय.

महाराष्ट्रात परतीचा पाऊस झोडपणार, मोठा इशारा, अलर्ट जारी, 24 तासात तब्बल..
Maharashtra Weather
| Updated on: Oct 02, 2026 | 8:29 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. कोरडा दुष्काळ सरकारकडून जाहीर करण्यात आला. स्थिती भयंकर आहे. पिके पाण्याअभावी करपून गेली. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. एल निनोचा प्रभाव देशात दिसत आहे. आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली. मॉन्सूनच्या पावसाने पाठ फिरवली असली तरीही राज्याला परतीचा पाऊस झोडपून जाताना दिसतोय. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. मॉन्सूनच्या परतीच्या पावसाला पोषक वातावरण तयार झाले. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. राज्यातील इतर भागात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. उत्तर म्यानमार आणि आग्रेय बांगलादेशमध्ये कमी दाबाचा क्षेत्र सक्रिय आहे.

दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. कर्नाटकपासून मन्नारच्या आखातापर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच विदर्भासह मराठवाड्यात काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

Loading...

यासोबतच ढगाळ वातावरण राहण्याचीही शक्यता राहणार आहे. यासोबतच काही भागात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. राज्यात परतीचा पाऊस तरी चांगला होईल, अशी अपेक्षा आहे. फक्त जुलै महिन्यातच समाधानकारक पाऊस झाला. राज्यात भीषण दुष्काळ बघायला मिळतोय. स्थिती गंभीर होत आहे. ऑक्टोबर महिन्यातच उन्हाचा चटका जाणून लागला आहे.

पुणे शहरात यंदा मान्सूनचा अनोखा पॅटर्न पाहायला मिळाला असून जून व सप्टेंबर कोरडे जाऊनही शहरात तब्बल 736.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यातील 508 मिमी मुसळधार पाऊस आणि ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यातील जोरदार पावसामुळे पुण्यात सरासरीपेक्षा 20 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपून गेले असून शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यावर आले आहे. अनेक शेतकरी नुकसान झालेले सोयाबीन काढून टाकत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us