70 किमी वेगाने ताशी वारे, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपिटीची शक्यता, 24 तासात..

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. 15 राज्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

70 किमी वेगाने ताशी वारे, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपिटीची शक्यता, 24 तासात..
Donald Trump
| Updated on: Aug 20, 2026 | 7:23 AM

राज्यात पाऊस कमी अधिक कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी आहे. बीड, परभणी, अहिल्यानगर, नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. हरदोई, कर्नाल या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. धाराशिव, लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज 20 ऑगस्ट रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या काळात अनेक भागांत ताशी 70 किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकते. डोंगराळ भागांसाठी दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून, अनेक नद्यांमधील पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढू शकते. 15 राज्यात पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्याच्या पूर्व भागातील धरणांची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. अक्कलकुवा-वडफळे परिसरातील अनेक धरणांमध्ये दमदार पाऊस न झाल्याने अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे भविष्यातील सिंचनाचा प्रश्न कायम असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नदी-नाल्यांना अद्याप मोठा प्रवाह आलेला नसल्याने धरणे भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. सध्या पिकांना विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा आधार मिळत असला, तरी भूजलपातळी वाढण्यासाठी आणि आगामी काळातील सिंचनाची गरज भागवण्यासाठी पुरेसा पाऊस होणे आवश्यक आहे. त्यामुळे खरीप हंगामाची आशा आता पूर्णपणे पावसावर टिकून असून, धरणे आणि जलसाठे भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही भागात पाऊस होत आहे तर काही भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us