12 जिल्ह्यांवर संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक, प्रशासनाकडून थेट..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. देशातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात आज येलो अलर्ट जारी केला.

12 जिल्ह्यांवर संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक, प्रशासनाकडून थेट..
Yellow alert
| Updated on: May 13, 2026 | 7:12 AM

राज्यासह देशातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. राज्यात उष्णतेने कहर केला. काही राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यात आज पुन्हा भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा अलर्ट जारी केला. भारतीय हवामान विभागाने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला. परभणी, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, बुलढाणा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज जळगाव, परभणी, नंदूरबार, बीड, जालना, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, पुणे, धुळे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 घरातून बाहेर निघणे टाळावे. उष्णतेचा अलर्ट जारी केला. प्रशासनाकडून नागरिकांना काही सूचना देखील देण्यात आल्यात.

एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात उष्णता अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय. मात्र, अचानक अवकाळी पाऊसही होताना दिसत आहे. मुंबईमध्येही उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला. पुढील काही दिवसात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्यात आली.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने तापमानाचा पारा देखील आता 42 अंश पार गेला. छत्रपती संभाजीनगर शहरात प्रमुख रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाली. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून 43.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान पुढील दोन दिवसासाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला.

जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. जळगावच्या तापमानात गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली. उष्णतेच्या झळा आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत. शीतपेयांच्या दुकानावर नागरिकांची गर्दी वाढली. 24 तासात जळगावच्या तापमानात तब्बल 2 अंशांनी वाढ. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचे आवाहन.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us