आवडीनं बनवत होते मॅगी, शिजवताना आढळल्या अळ्या, कल्याणमध्ये चिमुकल्यासोबत किळसवाणा प्रकार
कल्याणमध्ये मॅगी शिजवताना त्यात चक्क आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पॅकेटवरील एक्सपायरी डेट फेब्रुवारी २०२७ असतानाही हा प्रकार घडल्याने मोठ्या ब्रँडच्या खाद्यगुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुनिल जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण: कल्याणमध्ये मॅगी शिजवत असताना त्यामध्ये चक्क आळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंधित मॅगीच्या पॅकेटवर फेब्रुवारी 2027 ही एक्सपायरी तारीख नमूद असल्याचे सांगण्यात येत आहे.
1 / 6
तुकाराम मुंढे यांचं FDA खातं महाराष्ट्रभर कारवाई करत असताना मोठ्या ब्रँडच्या उत्पादनात आळ्या आढळल्याने खाद्यगुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नमुना तपासणीची मागणी करण्यात आली आहे.
2 / 6
दरम्यान, सदरील प्रकार हा एका चिमुकल्याने सांगितला आहे.
"रात्री एक वाजता गणपती विसर्जन करुन आल्यावर भूक लागली होती. त्यानंतर आम्ही मॅगी बनवली आणि खायला घेतल्यावर सदरील प्रकार समोर आला. "
3 / 6
"दोन अळ्या आढळून आल्यानंतर आम्ही पॅकेटवरची एक्स्पायरी डेट तपासून पाहिली तर त्यावर फेब्रुवारी २०२७ तारीख होती. त्यामुळे एवढ्या लवकर कशी काय खराब झाली."
4 / 6
"मॅगी बनवणारी कंपनी दावा करते की आम्ही स्वच्छतेचं पालन करतो तर मग हा जो प्रकार झाला आहे," तो कसा झाला असा प्रश्न ग्राहकाने विचारला आहे.
5 / 6
मॅगी मोठा ब्रँन्ड आहे सांगते तर मग गेल्याच महिन्यात खरेदी केलेल्या पाकिटांमध्ये अळ्या कशा? हे जर चुकून आम्ही खाल्लं असतं आम्ही रुग्णालयात असतो, तर काय झालं असंत? याचं उत्तर मॅगीनेच दिलं पाहिजे, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
(दरम्यान, आता याप्रकरणी Nestlé Indiaचे स्पष्टीकरण दिलं आहे.
संबंधित ग्राहक किंवा सरकारी यंत्रणांकडून अद्याप संपर्क झालेला नसल्याने तक्रारीच्या सत्यतेवर भाष्य करता येणार नसल्याचे कंपनीचे म्हणणे आले आहे. कच्च्या मालाच्या खरेदीपासून अंतिम उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कठोर गुणवत्ता व अन्नसुरक्षा तपासणी केली जाते आणि सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात, असा Nestle Indiaचा दावा केला आहे.)