४०० किमीची रेंज, किंमत १० लाखांहून कमी, या इलेक्ट्रीक सुव्हचा हंगामा, २०० टक्के खप वाढला…
टाटा मोटर्सचे भारतीय इलेक्ट्रीक कार बाजारपेठेत वर्चस्व आहे.देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रीक एसयूव्ही, टाटा पंच ईव्हीने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मागणीच्या बाबतीत,पंच ईव्हीने इतर सर्वांना मागे टाकले आहे.

भारतीय इलेक्ट्रीक कार मार्केटमध्ये टाटा मोटर्सने कमाल केली आहे. देशाची आवडती इलेक्ट्रीक एसयुव्ही टाटा पंच ईव्ही असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात पंच ईव्ही देशी महिंद्रा 9S नंतर दुसरी सर्वाधिक विक्री झालेली इलेक्ट्रीक कार झाली आहे. मात्र, मागणीच्या बाबतीत पंच ईव्हीने सर्वांना मागे टाकले आहे. या दरम्याने पंच ईव्हीने 200 टक्के वार्षिक वाढीसह 4,430 यूनिट एसयूव्हीची विक्री केली आहे. तर एक वर्षांपूर्वी हा आकडा 1,476 यूनिट्स होता. चला जाणून घेऊयात पंच ईव्हीचे फिचर्स, ड्रायव्हींग रेंज आणि किंमतीची माहिती घेऊयात..
टाटा पंच ईव्ही
टाटा पंच ईव्ही रेग्युलर पेट्रोलवाल्या पंचहून खूप वेगळी आणि मॉडर्न दिसत आहे. या कारच्या पुढे दिलेल्या कनेक्टेड एलईडी लाईट बार ( LED Light Bar ) आणि क्लोज्ड ग्रिल यास एकदम नव्या जनरेशनची इलेक्ट्रीक कारचा लूक देतात. याच्या फ्रंट बंपरवर चार्जिंग पॉर्ट देखील लावले आहेत. कारच्या आत 10.25 – इंचाची मोठी टचस्क्रीन आणि डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे. तसेच व्हेंटिलेटेड सीट्स, सनरुफ, आणि वायरलेस चार्जर सारखे फिचर्स देखील देण्यात आले आहे.
400 किमीहू जास्त रेंज
टाटा पंच ईव्ही दोन वेगळे-वेगळे बॅटरी पर्याय दिले आहेत. पहिला स्टँडर्ड व्हेरिएंट असून त्यात 25 kWh बॅटरीचा आहे. सिंगल चार्जवर सुमारे ३१५ किमीची रेंज ही बॅटरी देते.दुसऱ्या ‘लाँग रेंज’ व्हेरिएंटमध्ये 35 kWh बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 421 किलोमीटरपर्यंत शानदार रेंज देते. ही कार केवळ 9.5 सेकंदात 0 ते 100 किमी/प्रति तास वेग पकडू शकते. ही केवळ 56 मिनिटात 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होतील.
सुरक्षेतही बेस्ट
टाटा पंच ईव्ही देशाची सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. भारत एनसीएपी ( BNCAP ) क्रॅश टेस्टमध्ये यास एडल्ट आणि मुलांसाठी सुरक्षेसाठी 5-स्टारची रेटिंग दिली आहे. यात सर्व व्हेरिएट्समध्ये 6-एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल ( ESC ) आणि चार चाकात डिस्क ब्रेक सारखे फिचर्स स्टँडर्ड दिले आहेत. या कारची एक्स-शोरुम किंमत सुमारे 9.69 लाखापासून सुरु होऊन 12.69 लाख रुपयांपर्यंत जाते.
