AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठं संकट! आजचा दिवस धोक्याचा, घराबाहेर पडणे टाळाच, अत्यंत मोठा इशारा

Maharashtra Rain Update : मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर भारतीय हवामान विभागाने देखील मोठा इशारा दिलाय. यामुळे संकट अधिकच वाढले आहे.

मोठं संकट! आजचा दिवस धोक्याचा, घराबाहेर पडणे टाळाच, अत्यंत मोठा इशारा
Rain
| Updated on: Sep 14, 2025 | 9:03 AM
Share

मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतोय. आज अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाचे ढग राज्यावर आहेत. पंजाब, हरिणाया आणि जम्मू काश्मीरमध्ये तर पावसाने हाहाकार माजवलाय. आज रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मुंबईला येलो अलर्ट. सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, लातूर, अकोला, धाराशिव, अमरावती, नागपूर, भंडारा या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज फार महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे.

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोपून काढलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आणि यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहताय. चंद्रपूर शहराजवळील इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे.

यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि हीच नदी चंद्रपूर जिल्ह्यात पूर येण्याचं कारण ठरू शकते. वर्धा नदीला आलेल्या पुराचा फटका इरई नदीला देखील बसला असून यामुळे चंद्रपूर शहरातले रहमत नगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचे पाणी शिरलं आहे. यामुळे काल रात्री जवळपास 50 ते 60 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे.

-बुधवारपर्यंत पावसाचा येल्लो अलर्ट नाशिकला देण्यात आलाय. रविवारी आणि सोमवारी शहरासह ग्रामीण भागात सोसाट्याचा वाऱ्यासह वादळी पावसाची दाट शक्यता. पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी लावल्याचे बघायला मिळतंय. शनिवार ते बुधवारपर्यंत हवामान विभागाकडून नाशिकला येल्लो अलर्ट देण्यात आला. शनिवारी अल्प प्रमाणात हजेरी लावलेल्या पावसाची 2. 6 मिलिमीटर नोंद झाली. मुंबईमध्येही रात्रभर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...