AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर संकट! 16 ते 18 सप्टेंबर धोक्याची, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा

Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पावसाची हजेरी बघायला मिळाली. शेवटी दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे बघायला मिळतंय. मात्र, आता परत एकदा भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलाय.

राज्यावर संकट! 16 ते 18 सप्टेंबर धोक्याची, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा
Rain
| Updated on: Sep 11, 2025 | 2:43 PM
Share

राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे बघायला मिळतंय. मात्र, अजून पाऊस गेलेला नाहीये. परत एकदा जोरदार पाऊस राज्यात बघायला मिळेल. यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल झाला आणि जोरदार झाला. हेच नाही तर सततच्या पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झाले. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर या भागात पावसाचा कहर सुरू आहे. सततच्या पावसामुळे आणि पुरामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर अनेक लोक पुरात वाहून गेली.

राज्यात पुढील आठवड्यात परतीचा पाऊस धडकणार

पुढील आठवड्यात परतीचा मॉन्सून धडकणार आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणात कोसळणार असल्याचे सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील जवळपास धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.

राज्यातील जवळपास धरणे ओव्हर फ्लो

यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झालीये. पुढील 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान राज्यावर आणि देशावर पावसाचे संकट हे राहणारच आहे. यादरम्यान नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. फक्त पाऊसच नाही तर जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस होईल, असा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाच्या अगोदर शेती कामे उरकून घेण्यास सुरूवात केलीये.

भारतीय हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा

राज्यात पावसाची सुरू असलेली उघडझाप यामुळे कमाल तापमानात वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, नाशिक, पुणे, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर या भागात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. काही भागात मागे झालेल्या पावसामुळे शेतीच्या पिकांचे नुकसान झाले. कित्येक हेक्टर पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. पावसाचा सर्वाधिक फटका हा यंदा नांदेड जिल्हात बसलाय.

सोलापूरात रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी

सोलापूर शहराला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलं. शहारातील अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर, शेळगी यासह अनेक भागात मुसळधार पाऊस. विजांच्या प्रचंड कडकडाटासह शहरातील अनेक भागात रात्रभर तुफान पाऊस झाला. रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागातल्या नागरी वस्तीत शिरले पाणी. लोकांच्या घरात 2-3 फूट पाणी शिरल्याने रात्री लोकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ.

वसई विरार नालासोपारात सकाळी सकाळी पावसाच्या सरी

वसई विरार नालासोपारा परिसरात पाऊसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दोन दिवसाच्या उघाडीनंतर आज सकाळपासून पाऊस रिम झिम बरसत आहे. परिसरात ढग दाटून आले असून पाऊसचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांची उडाली तारांबळ उडाली. सोलापूरात देखील पावसाचा कहद बघायला मिळतोय.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.