AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर निघणे टाळा, या राज्यांमध्ये अलर्ट, भारतीय हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळत आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस होताना दिसतोय. देशभरात पावसाचा कहर हा सध्या बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

सावधान! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर निघणे टाळा, या राज्यांमध्ये अलर्ट, भारतीय हवामान विभागाचा इशारा
Heavy rain
| Updated on: Aug 29, 2025 | 9:59 AM
Share

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळतंय. आज भारतीय हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रात्रीही पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. सकाळी देखील पावसाची संततधार सुरू असल्याचे बघायला मिळाले. मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात आज पावसाचा इशारा देण्यात आलाय. देशातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा कहर सुरू आहे. आता याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. आंध्रप्रदेश, गोवा, ओडिसा, आसाम, मेघालय, राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये मोठा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेडमध्येही अतिमुसळधार पावसामुळे काही रस्ते बंद करण्यात आली होती. नांदेडमधील उमरखेड महागाव तालुक्यातील शाळांना सुट्टी काल झालेल्या मुसळधार पाऊस आणि आज हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाच्या अंदाज नुसार देण्यात आली आहे. उमरखेड महागाव तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयाना सुट्टी प्रशासनाने जाहीर केली.

मुसळधार पावसाचा इशारा असल्याने वसमत विभागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. वसमत उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी ही माहिती दिली. परळीसह सतरा गावांना पाणी पुरवणारे नागापूर धरण ओव्हर फ्लो झाले आहे. परळी तालुक्यातील नागापूर धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे परळी सिंहासह 17 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून परळी तालुक्यात दमदार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील प्रकल्प बंधारे तलाव वसांडून वाहत आहेत.

गोंदिया जिल्ह्यात काल आलेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणाच्यां पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणाचे 8 दरवाजे 1 फूट उंचीले सुरू करण्यात आले. यामधून 6359.14 कयुसेक पाण्याच्या विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे . तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्वांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे. तेलंगाना राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे श्रीपादम व येल्लंमपल्ली या दोन धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. तेलंगणा सरकारने महाराष्ट्र सीमावरती भागातील गावांना अलर्टचा इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व अहेरी या दोन तालुक्यांना अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घ्यावी असा आव्हान करण्यात आले आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....