AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! घराच्या बाहेर निघणे टाळा, राज्यावर संकट, अलर्ट जारी, पुढील 24 तास…

Maharashtra Rain Update : मागील काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळताना दिसतोय. आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा अलर्ट जारी केला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सावधान! घराच्या बाहेर निघणे टाळा, राज्यावर संकट, अलर्ट जारी, पुढील 24 तास...
Thunderstorm
| Updated on: Nov 02, 2025 | 8:00 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस हजेरी लावताना दिसतोय. आजही अनेक भागात सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झालंय. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून पाऊस अजूनही सुरू असल्याचे दिसतंय. पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झाले. आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. फक्त राज्यच नाही तर देशातील काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे  संकेत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल, सिक्किम,बिहार या भागात पावसाचा अलर्ट आहे.

कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मोठा इशारा 

अंदमान निकोबार येथे अतिमुसळधार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात 5 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. पुढील काही दिवसही पावसाचे संकट देशावर कायम असल्याचे बघायला मिळतंय. पंजाबनंतर महाराष्ट्रात पावसाने मोठे थैमान घातले. पूर्ण शेती वाहून गेली. हाताला आलेले पिक शेतकऱ्यांचे गेले. मात्र, आता अजूनही पावसाने आपला कहर थांबवला नसलयाचे स्पष्ट दिसतंय.

भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी 

पुढील 24 तास कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. नंदूरबार, जळगाव, धुळे, आहिल्यानंतर, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांडेद, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता आहे. मागे झालेल्या अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान मराठवाड्याचे झाले होते. मोठा पाऊस मराठवाड्यात झाला.

5 तारखेपर्यंत राज्यावर पावसाचे ढग कायम 

मराठवाड्यावरील संकट असूनही टळले नसून पावसाचा मोठा इशारा मराठवाड्याला देण्यात आलाय. अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहिर केली. मात्र, काही भागात अजूनही ही मदत पोहोचली नसल्याचा आरोप केला जात आहे. मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मोंथा चक्रीवादळ शांत झाले असूनही देशातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.