AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर संकट! 24 तास धोक्याची, प्रशासनाने केला मोठा अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह…

IMD Weather Update : सततच्या पावसामुळे शेतकरी राजासह लोक वैतागली आहेत. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. आजही राज्यावर पावसाचे सावट कायम आहे.

राज्यावर संकट! 24 तास धोक्याची, प्रशासनाने केला मोठा अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह...
Heavy Rain Warning
| Updated on: Nov 01, 2025 | 10:20 AM
Share

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून पावसाने थैमान घातलंय. 1 नोव्हेंबर उजाडला असूनही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलाय. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस कोसळला असून सकाळीही पावसाचा जोर बघायला मिळतंय. विदर्भ, मराठवाड्यात आजही पावसाचा इशारा आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. ढगाळ वातावरण राज्यातील अनेक भागात असेल. विजांसह पावसाचा अलर्ट आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत असून पिकांचे मोठे नुकसान झाले. दिवाळीनंतरही राज्यात पाऊस सुरू आहे. मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही असून त्यामुळे कमी दाबाचापट्टा निर्माण झाला.

नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मुंबई नाशिक आणि धुळेसह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट आणि ‘हाय अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये पुढील 24 तासांसाठी हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने ढगाळ वातावरणही बघायला मिळतंय.

पुढील एक ते दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहील  नंदुरबार, जळगाव, धुळे, आहिल्यानगर रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे पालघर या भागात पाऊस होईल. फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलाय. आंध्रप्रदेशात मोंथा चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले. या वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पाऊस पडतोय.

सततच्या पावसाने शेतकऱ्यांवर घाला, कापणी केलेल्या धानालाच फुटले अंकुर. गोंदियात शेतकऱ्यांचे धान पिकले पण वाचले नाही, शेतातच झाले नुकसान. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात गेली. धानाला शेतातच फुटले अंकुर. अतिवृष्टी, रोगकिडी आणि आता अवकाळी पाऊस, शेतकरी हतबल झाले आहेत. जालना जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या मदतीपासून अद्यापही वंचित. दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर जाहीर केलेल्या मदतीचा एकही रुपया न आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण. जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना बसला होता अतिवृष्टीचा मोठा फटका.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.