मोठी बातमी! भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर? गिरीश महाजन येताच मंत्र्याचं बैठकीतून वॉक आऊट
मोठी बातमी समोर येत आहे. आज जळगावमध्ये भाजपच्या जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत मंत्रि गिरीश महाजन दाखल होताच, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी काढता पाय घेतल्याचं पहायला मिळालं.

मोठी बातमी समोर येत आहे. आज जळगावमध्ये भाजपच्या जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत मंत्री गिरीश महाजन दाखल होताच, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी काढता पाय घेतल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. रक्षा खडसे यांची उद्या दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी त्यांना दिल्लीमध्ये जायचं आहे, त्यांचं विमान सात वाजता असल्यामुळे त्या बैठकीतून एक तास आधीच बाहेर पडल्या, त्यांनी त्याबद्दल मला माहिती दिली आहे, असा खुलासा यावर मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. पक्षामध्ये कोणताही वाद नाही, त्यांच्या घरचा काय विषय असेल तो वेगळा विषय आहे, असंही यावेळी महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील सर्व बडे नेते उपस्थित होते. परंतु निमंत्रण असून देखील भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, एकही भाजप नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, त्यामुळे मंत्री रक्षा खडसे या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
त्यातच आज भाजपच्या जळगाव जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये गिरीश महाजन येताच रक्षा खडसे बैठकीतून बाहेर पडल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मात्र यावर महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उद्या रक्षा खडसे यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आहे. त्यासाठी त्या बैठकीतून एक तास आधीच बाहेर पडल्या असा खुलासा यावर गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच पक्षात कोणतेही अंतर्गत वाद नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दरम्यान खडसे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे एकनाथ खडसे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. तसेच महाजन यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.