AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस-शिवसेना शिंदे गटाने मिळून शरद पवारांना दिला झटका,मनातली खदखद आली बाहेर

म्हणजे काही ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना आहे. हे फक्त महायुतीमध्येच घडतय असं नाहीय, तर महाविकास आघाडीतही अनेक ठिकाणी फूट पडली आहे.

काँग्रेस-शिवसेना शिंदे गटाने मिळून शरद पवारांना दिला झटका,मनातली खदखद आली बाहेर
Sharad Pawar-Eknath Shinde
| Updated on: Nov 24, 2025 | 9:42 AM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विचित्र युत्या, आघाड्या आकाराला येत आहेत. स्थानिक पातळीवरील गरजेनुसार युती वा आघाडी होत आहे. यात वैचारिक भूमिका कुठेही नाही. राज्य पातळीवर सध्या महायुती, महाविकास आघाडी आहे, तर केंद्रात एनडीए आणि इंडिया आघाडी आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातील पक्ष या युती आणि आघाडींमध्ये विखुरलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत. एक गट महायुती तर दुसरा महाविकास आघाडीत आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवरील ही युती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र बिघडली आहे. सध्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत.

2 डिसेंबरला मतदान असून 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. या निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी मित्र पक्षच परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.  जळगावच्या चोपडा नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे. तिथे सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारी आघाडी आकाराला आली आहे. त्यावर शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. कारण त्यांचा पक्ष चोपडा नगर परिषद निवडणुकीत एकटा पडला आहे.

लोकांना या गोष्टींचा वीट आला आहे

“सत्तेत वाटा मिळावा यासाठीच काँग्रेस हा पक्ष शिवसेना शिंदे गटासोबत युती करून सोयीच राजकारण करतोय” अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी डॉ चंद्रकांत बारेला यांनी केली आहे. चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीला सोडून शिंदे गटासोबत युती केली. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. “काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आलं म्हणून मतदार सुद्धा एकत्र येतील एवढी जनता दूध खुळी नाही, लोकांना या गोष्टींचा वीट आला आहे” असं डॉ.चंद्रकांत बारेला यांनी म्हटलं आहे.

शरद पवार गट एकटा पडला

“लोक या अभद्र युतीला कंटाळले आहेत. कदाचित सत्तेच्या तसेच पैशांच्या मोहापायी आज चित्र बदललेलं आहे, मात्र ते फार काळ टिकणार नाही” असं देखील बारेला म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गट चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत केवळ दोन जागा लढत आहे. जळगावच्या चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली असून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला लांब ठेवल्याचे पहायला मिळत आहे. चोपडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने चक्क शिवसेना शिंदे घटना सोबत युती केली तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकटा पडला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...