AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांशी शारीरिक संबंध अन् नंतर हत्या, जळगावच्या जंगलात सुरू होता खुनी खेळ, आरोपीचा सीडीआर पाहून पोलीस हादरले

आरोपीचा महिलांशी संपर्क कोणत्या उद्देशाने होत होता, याचीही माहिती मिळवण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे. आरोपी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करीत असल्याचं देखील समोर आलं आहे.

महिलांशी शारीरिक संबंध अन् नंतर हत्या, जळगावच्या जंगलात सुरू होता खुनी खेळ, आरोपीचा सीडीआर पाहून पोलीस हादरले
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Aug 01, 2025 | 7:00 AM
Share

जळगावमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे,  एका व्यक्तीने महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर या महिलांची हत्या करून त्यांना जंगलातच गाडलं, ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनिल संदानशिव असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, आता पोलीस तपासामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत आहे.

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची हत्या करणाऱ्या आरोपीचे इतरही अनेक महिलांशी फोनवरून संभाषण झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. आरोपीचे सिडीआर काढल्यानंतर त्याने अनेक महिलांशी संभाषण केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे आरोपीने आणखी काही महिलांचा खून केला आहे का? हे तपासण्यासाठी आता   स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. आरोपी अनिल संदानशिव याने ज्या महिलांसोबत फोनवरून संभाषण केलं, त्या महिला जिवंत आहेत का? की त्यांनाही मारण्यात आलं आहे? याची माहिती काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथक रवाना झाले आहेत.

दरम्यान आरोपीचा महिलांशी संपर्क कोणत्या उद्देशाने होत होता, याचीही माहिती मिळवण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे. आरोपी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करीत असल्याची माहिती देखील पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. आरोपी अनिल संदानशिव याने आणखी गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची दगडानं ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता, या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी अनिल संदानशिव याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी हा विवाहित महिलांना लक्ष्य करायचा. तो त्यांच्याशी सुरुवातीला गोड बोलायचा, त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तो जंगलात जाऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा त्यानंतर त्यांची हत्या करायचा. पोलिसांना दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?