उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याचे लग्नासाठी अनोखे आंदोलन, फलक घेऊन बाशिंग बांधून…

| Updated on: May 12, 2023 | 4:04 PM

Jalgaon News : ग्रामीण भागात राहणाऱ्या युवकांची परिस्थिती सध्या विचित्र होऊ लागली आहे. ग्रामीण भागात सर्व संपन्न घर असतानाही त्यांना मुली मिळत नाही. लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून एका शेतकऱ्यांने आंदोलन केले.

उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याचे लग्नासाठी अनोखे आंदोलन, फलक घेऊन बाशिंग बांधून...
Follow us on

जळगाव : शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. मुलींना नोकरीवालाच नवरा पाहिजे असतो. ग्रामीण भागात राहणार शेतकरी नवरा म्हणून नको असतो. मग हा शेतकरी किती समुद्ध असला, निर्व्यसनी असला तरी त्याला वधूपिता सुद्धा जावाई म्हणून त्याचा स्वीकार करत नाही. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मुलांची लग्न होत नाही. त्यांचे वय वाढत आहे. पण लग्न होत नाही. शिक्षण आहे, शेती आहे, पैसा आहे, सर्व काही असताना लग्न होत नसल्यामुळे एका शेतकरी मुलाने अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

कुठे केले आंदोलन

जळगावच्या पाचोऱ्यात उच्च शिक्षित तरुणाने अनोखे आंदोलन केले आहे. ‘बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे’ असे मोठमोठ्याने ओरडत घोषणा देत, हातात फलक घेऊन कपाळी मुंडावळ (बाशिंग) बांधून नवरदेवाच्या वेशात या तरुणाने पाचोराकरांचे लक्ष वेधून घेतले.

हे सुद्धा वाचा

बीएस्सी ॲग्री झालेला शेतकरी

नाचणखेडे, ता. पाचोरा येथील दहा एकर बागायती शेतीचा मालक आहे. बीएस्सी ॲग्रीचे उच्च शिक्षण झाले आहे. त्या तरुण शेतकऱ्याचे नाव पंकज राजेंद्र महाले आहे. लग्नासाठी वधूच्या शोधार्थ फिरून केवळ नोकरी नसल्याने नकार मिळत असल्याने तो निराश होता. बागायतदार शेतकरी पुत्र असूनही मुलगी मिळत नाही. मग शेतकऱ्यांच्या पोरांनी लग्न कुणाबरोबर करायचे? यासाठी या तरुणाने अनोखे आंदोलन केले.

मुलींची संख्या कमी, अपेक्षा जास्त

दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत असल्याने समाजात लग्नासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. अशातच मुलींचा व त्यांच्या आई-वडिलांचा कल नोकरी व शहरात असलेल्या तरुणांकडे जास्त झाला आहे. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलांना मुली नाकारत आहेत. त्यांची लग्न होत नाही. बेरोजगार व खेड्यात राहणाऱ्या तरुणांना या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

अनेक मुलांची रखडली

ग्रामीण भागात शेतकरीच नाही तर इतर व्यवयास करणाऱ्या मुलांनाही मुली मिळत नाही. मुलींना आता मोठी शहरे, फ्लॅट, गाडी हवी असते. त्यांना ग्रामीण भागातील जीवन नको असते. त्यामुळे अनेक मुली ग्रामीण भागात लग्नास तयार होत नाही.