AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थाटामाटात लग्न पार पडले, नववधूचे उत्साहात स्वागत झाले; मात्र संसार सुरु होण्याआधीच…

एका तरुणाचे लग्न जमत नव्हते. त्याने अखेर लग्न जमवणाऱ्या एका दलालाशी संपर्क साधला. यानंतर दलालामार्फत या तरुणाचे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. पण दुर्दैवाने त्याचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

थाटामाटात लग्न पार पडले, नववधूचे उत्साहात स्वागत झाले; मात्र संसार सुरु होण्याआधीच...
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरीचे पलायनImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 11, 2023 | 12:21 AM
Share

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. वाजत गाजत वरात घरी आली. मोठ्या उत्साहात नववधूचे स्वागत झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी नवविवाहित जोडप्याची हनिमूनची रात्र होती. मात्र नवरीने आपली तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगत टाळाटाळ केली. यानंतर नवरी सासूसोबत झोपायला निघून गेली. रात्री नवऱ्याला झोपेतून जाग आली. तो आईच्या खोलीत आपल्या नवविवाहित पत्नीला पहायला गेला अन् त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची पत्नी घरातून गायब होती. तसेच घरातील दागिने आणि पैसेही गायब होते. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले.

दलालामार्फत लग्न जुळले

मेरठमधील तरुणाचे 40 वय उलटले तरी लग्न जमत नव्हते. यामुळे तरुणासह त्याचे कुटुंबीयही चिंतेत होते. यादरम्यान त्यांना कुणीतरी उत्तराखंडच्या लग्न जमवणाऱ्या एका दलालाबाबत सांगितले. कुटुंबीयांनी त्या दलालाकडे संपर्क साधला. दलालाने उत्तराखंडमधील हल्दानी येथील एका तरुणीचे स्थळ तरुणाला दाखवले. दोन्हीकडची पसंती झाली. मग थाटामाटात लग्न पार पाडले आणि वरात मेरठला आली.

रात्री सर्व झोपल्यानंतर नवरी फरार झाली

सासरच्या घरात नववधूचे जंगी स्वागत करण्यात आले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधूची हनिमूनची रात्र होती. मात्र तरुणीने आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगत हनिमूनला नकार दिला. यानंतर तरुणी सासूच्या खोलीत झोपायला गेली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तरुणाला जाग आली असता तो आईच्या खोलीत आपल्या पत्नीला पहायला आला. मात्र खोलीत पत्नी नव्हती. त्याने घरभर पाहिले तिचा कुठेच पत्ता नव्हता. घरातील दागिने आणि पैसेही गायब होते.

यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. नवदेवाने तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तरुणी एका तरुणासोबत बाईकवरुन पळून जात असल्याचे दिसले. पोलीस तरुणीचा शोध घेत आहेत.

Follow Us
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल.
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद.
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स....
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स.....
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.