AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत बाईक चोरायचे अन् गुजरातला पळायचे, चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लढवली ‘ही’ शक्कल !

दिवसा गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम करायचे आणि रात्री बाईक चोरायचे. मुंबईत बाईक चोरुन चोरटे गुजरातला पसार झाले होते. मात्र मुंबई पोलिसांनी शक्कल लढवली.

मुंबईत बाईक चोरायचे अन् गुजरातला पळायचे, चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लढवली 'ही' शक्कल !
मुंबईत बाईक चोरणाऱ्या आरोपींना गुजरातमधून अटकImage Credit source: TV9
| Updated on: Apr 10, 2023 | 11:47 PM
Share

मुंबई / गोविंद ठाकूर : दिवसा गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम करुन रात्री बाईक चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. बोरीवली पश्चिम एमएचबी पोलिसांनी चोरट्यांना गुजरात येथून बेड्या ठोकल्या आहेत. पुनेश वेला कोळी आणि संजय शिवभाई कोळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी मूळचे गुजरातचे आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या चोरट्यांनी आतापर्यंत किती बाईक चोरल्या आणि कोणाला विकल्या याचा तपास सध्या एमएचबी पोलिसांकडून सुरू आहे.

चोरीला गेलेल्या बुलटेचा शोध घेत असताना आरोपी अटक

एमएचबी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक बुलेट चोरीला गेली होती. सकाळी बुलेट मालकाने पाहिले तेव्हा गाडी तेथे नव्हती. यानंतर सदर व्यक्तीने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेत बाईक चोरीची तक्रार दाखल केली. यानंतर एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी त्यांच्या पथकासह तपास सुरु केला. पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता चोरटे बाईक घेऊन जाताना कैद झाले होते.

पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी सीसीटीव्हीमधील आरोपींचे फोटो काढून आसपासच्या लोकांना दाखवले. यावेळी आरोपी हे गॅरेजमध्ये मेकॅनिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपी आपला मित्र आहे सांगत त्यांचा मोबाईल नंबर मिळवला. मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता आरोपी गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून गुजरातच्या बहादूरगड कच्छ येथून एका आरोपीला बुलेटसह रंगेहाथ अटक केली. तपासात दुसऱ्या साथीदाराला बुलेट बाईक अडवताना अटक करण्यात आली. दुसऱ्या आरोपीकडून जप्त केलेली बुलेट बाईक सांताक्रूझ पोलीस ठाण्यातून चोरीला गेली होती.

Follow Us
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल.
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद.