AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हाईट धंद्याआड सुरु होता काळा धंदा, गुन्हे अन्वेषण विभागाने ‘असा’ केला भांडाफोड

डोंबिवली रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही बुकिंग केले जाते. याचा गैरफायदा घेत डोंबिवली स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात तिकिटांचा काळाबाजार सुरु होता.

व्हाईट धंद्याआड सुरु होता काळा धंदा, गुन्हे अन्वेषण विभागाने 'असा' केला भांडाफोड
डोंबिवलीत रेल्वे तिकिटाचा पर्दाफाश करणाऱ्या आरोपीला अटकImage Credit source: TV9
| Updated on: Apr 10, 2023 | 10:51 PM
Share

डोंबिवली / सुनील जाधव : डोंबिवली स्टेशन परिसरात दूध व्यवसायाच्या आडून सुरु असलेल्या रेल्वे तिकीटाच्या काळाबाजाराचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याला आरपीएफच्या गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त ऋषी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकत बेड्या ठोकल्या आहेत. सुनील दुबे असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 68 हजार रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. या प्रकणात तिकिटाचा काळाबाजार करण्यात आणखी काही रेल्वे कर्मचारी यात सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

दूध डेअरित सुरु होता काळाबाजार

डोंबिवली रेल्वे स्थानक हे अत्यंत रहदारीचे स्थानक असून, येथून दिवसाला लाखो प्रवासी ये जा करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे देखील स्थानकातून बुकिंग होते. प्रवाशांची संख्या जास्त असल्याचा फायदा दलाल घेत असून, या स्थानक परिसरात रेल्वे तिकिटांचा काळा बाजार देखील चालतो. डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात असलेल्या दूध डेअरित 500 ते 1000 रुपये प्रति सीट कमिशनवर रेल्वे तिकिटे विकली जात होती.

पोलिसांनी छापा टाकत आरोपीला केली अटक

याबाबत आरपीएफच्या गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त ऋषी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. डेअरीवर छापा टाकत डेअरी चालवणाऱ्या सुनील दुबे याला अटक केली असून, त्याच्याकडून आरपीएफने 1 लाख 68 हजार रुपये किमतीची 94 रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.