AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरूण चक्रवर्ती आणि संजू सॅमसन यांचा साधेपणा, जेतेपद मिळवल्यानंतर असा वावर Video

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपली असून आता संघातील खेळाडू आयपीएलच्या तयारीला लागले आहेत.असं असताना वरुण चक्रवर्ती आणि संजू सॅमसन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या साधेपणा या व्हिडीओतून दिसून आला आहे.

वरूण चक्रवर्ती आणि संजू सॅमसन यांचा साधेपणा, जेतेपद मिळवल्यानंतर असा वावर Video
वरूण चक्रवर्ती आणि संजू सॅमसन यांचा साधेपणा, जेतेपद मिळवल्यानंतर असा वावर VideoImage Credit source: video grab
| Updated on: Mar 13, 2026 | 7:41 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत करत जेतेपद मिळवलं. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर टीम इंडियातील खेळाडू आपआपल्या फ्रेंचायझीच्या तंबूत रूजू झाले आहेत. काही खेळाडू अजूनही घरी आराम करत असून सराव शिबिरात भाग घेणार आहेत. काही खेळाडू महिन्याभराच्या तणावातून मुक्त आता कुठे शांतपणे स्वत:साठी वेळ देत आहेत. कुलदीप यादव आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी लग्न करत आहे. तर वरूण चक्रवर्तीने वर्ल्डकप विजयाच्या आनंदात वॉशिंग्टन सुंदरसोबत 14 किलोमीटरची परिक्रमा केली. यावेळी वरूण चक्रवर्ती एका छोट्या दुकानावर बसलेला दिसला. तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई येथे एका छोटाश्या दुकानात वरूण चक्रवर्ती बसला होता. यात मोबाईलवर काही तरी स्क्रोल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वरूण चक्रवर्तीसारखाच संजू सॅमसनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात संजू सॅमसन एका चहाच्या दुकानात बसलेला दिसत आहे. वर्ल्ड चॅम्पियन संजू सॅमसनला असं चहाच्या दुकानात बसलेलं पाहून स्टाफही आवाक् झाला. कर्मचाऱ्यांनी या संधीचा फायदा उचलून त्याच्यासोबत काही फोटोही काढले. संजू सॅमसनने त्यांना नाराज केलं नाही. संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. सलग तीन सामन्यात अर्धशतकी करून टीम इंडियाला जेतेपद मिळवून दिलं. अंतिम सामन्यातही त्याने जबरदस्त खेळी केली. या कामगिरीसाठी त्याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटच्या पुरस्कारने गौरविण्यात आलं.

संजू सॅमसन टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 321 धावा केल्या. तर वरूण चक्रवर्ती गोलंदाजीत महागडा ठरला पण त्याने 14 विकेट काढत टीम इंडियाच्या विजयात हातभार लावला. भारताने जेतेपद मिळवल्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव केला आहे. टीम  इंडियाला 131 कोटींची रक्कम दिली आहे. त्यामुळे टीम इंडियातील 15 खेळाडूंना प्रत्येकी 6 कोटी रूपये मिळणार आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल