AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : मौनी अमावस्येच्या दिवशी करा हे खास उपाय, घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष होतील दूर

हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास महादेव आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहतो, आणि त्यांच्या कृपेमुळे घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात, अशी मान्यता आहे.

Vastu Shastra : मौनी अमावस्येच्या दिवशी करा हे खास उपाय, घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष होतील दूर
Mauni AmavasyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 13, 2026 | 7:40 PM
Share

मौनी अमावस्येचं हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी मौन व्रत धारण केल्यास, तसेच सूर्योदयाच्या वेळी अंघोळ करून देवाची पूजा आणि गरजू व्यक्तींना दान धर्म केल्यास इच्छित फळाची प्राप्ती होते, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. दरवर्षी माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान महादेवांच्या पुजेचं देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर महादेवांची पूजा केली तर महादेव प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो. तसेच महादेवांच्या कृपेनं घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात, अशी मान्यता आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी शिवलिंगावर काही झाडांची पानं अर्पण करणं देखील शुभ माण्यात आलं आहे. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊन तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे. आज आपण या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

माघ महिन्यात जी अमावस्या येते तिला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्मामध्ये या अमावस्याचं खूप महत्त्व आहे. या दिवशी मैन व्रत धारण करणं शुभ मानलं जातं. या दिवशी सूर्योदयापूर्वी अंघोळ करून महादेवाची पूजा केल्यास तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होतं अशी मान्यत आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला शुद्ध पाण्यानं अंघोळ घाला, त्यानंतर पंचामृत देखील अर्पण करा. पंचामृतानंतर पु्न्हा एकदा शुद्ध पाण्यानं शिवलिंगाला अंघोळ घाला. महादेवांची प्रार्थना करा. त्यानंतर भगवान महादेव यांना बेलाची पान, आणि शमीची पान अर्पण करा. यामुळे तुमच्यावर महादेव प्रसन्न होतात, महादेवांच्या कृपेनं घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात अशी मान्यता आहे.

बेलाची पान – भगवान महादेवांना बेलाची पान ही अत्यंत प्रिय आहेत, बेलाचे दोन प्रकार असतात. एक अखंड बेल असतो. महादेवांच्या पुजाविधीमध्ये अखंड बेलाचं विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला अंखड बेलाची पानं मिळाली तर ती महादेवांना अर्पण करावी, तर दुसरा हा साधा बेल असतो. जो तीन पानांचा असतो. जर तुमच्याकडे अखंड बेल नसेल तर तुम्ही शिवलिंगावर साध्या बेलाची पानं देखील अर्पण करू शकतात. यामुळे घरतील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.

शमीची पानं – भगवान महादेव यांना शमीची पानं देखील अत्यंत प्रिय आहेत, मौनी अमावस्येच्या दिवशी महादेवांना शमी वृक्षाचे पानं अर्पण केल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.