AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs MI : मुंबई चेन्नईचा हिशोब करण्यासाठी सज्ज, 2 गुणांसाठी जोरदार चुरस, कोण जिंकणार?

Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2026 : चेन्नई आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.

CSK vs MI : मुंबई चेन्नईचा हिशोब करण्यासाठी सज्ज, 2 गुणांसाठी जोरदार चुरस, कोण जिंकणार?
Mumbai Indians vs Chennai Super KingsImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 02, 2026 | 7:45 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 44 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार निर्णायक आणि महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना आपल्या शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तसेच चेन्नई आणि मुंबईची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. चेन्नईने गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सवर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईचा गेल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवाचा हिशोब करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता मुंबई यशस्वी ठरणार की चेन्नई पुन्हा मैदान मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई आणि चेन्नईची वाईट स्थिती

मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र 19 व्या मोसमात दोन्ही संघांची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. चेन्नईची मुंबईच्या तुलनेत ठिकठाक कामगिरी राहिली आहे. मुंबईला 8 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. मुंबईने या मोहिमेत 2012 नंतर पहिल्यांदा आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. मात्र त्यानंतर मुंबईला सलग 4 पराभवानंतर दुसऱ्या विजयाची चव चाखता आली. त्यानंतर मुंबईने सलग 2 सामने गमावले. मुंबई ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे.

तर चेन्नई सुपर किंग्स कामगिरीत सातत्य ठेवण्यात अपयशी ठरलीय. चेन्नईची सलग 3 पराभवांसह सुरुवात झाली. मात्र त्यानंतर चेन्नईने दमदार कमबॅक करत सलग 2 सामने जिंकले. चेन्नईचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर चेन्नईने इतिहास घडवला. चेन्नईने 23 एप्रिलला मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये 103 धावांनी पराभूत केलं. चेन्नईचा हा धावांबाबत सर्वात मोठा विजय तर मुंबईचा सर्वात मोठा पराभव ठरला. चेन्नई मुंबईला 100 आणि त्यापेक्षा अधिक धावांनी पराभूत करणारी पहिलीच टीम ठरली. त्यामुळे या हंगामातील दुसऱ्या एल क्लासिको सामन्यात कोण यशस्वी ठरतो यासाठी निकालाची प्रतिक्षा पाहावी लागणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान उभयसंघात आतापर्यंत एकूण 40 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने त्यापैकी सर्वाधिक 21 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 19 सामन्यांत मुंबईला पराभूत केलं आहे. अशात आता 41 व्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल